न्यूयॉर्क (अमेरिका) : आपल्याला कंस मामा माहिती आहे. श्रीकृष्णांच्या जन्माच्या आधी जन्मलेल्या सातही बाळांची अमानुषपणे हत्या करणारा कंस मामाला सर्वचजण ओळखतात. पण याच कंस मामासारखं कृत्य अमेरिकेत एका बापाने केलं आहे. त्याने नवजात बाळाला हवेत फेकत त्याची हत्या केली आहे. खरंतर त्या बाळाची काहीच चूक नव्हती. तरीही त्याने त्याची हत्या केली. त्यामुळे पित्याच्या या अमानुष कृत्यावर जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. जगभरातील विविध माध्यमांनी या घटनेची दखल घेतली आहे.
आई-वडिलांचं आपलं आयुष्यात खूप महत्त्व असतं. आई-वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करतात. पण अमेरिकेच्या टेक्सास शहरात तर बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम बापाने नवजात बालकाची हत्या केली आहे. मृतक बाळ हे अवघ्या 24 दिवसांचं होतं. नवजात बाळाची अशी अमानुषपणे हत्या करणाऱ्या पित्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी पिता 17 वर्षीय आहे. त्याचं कालेब असं नाव आहे. तर त्याच्या पत्नीचं रशेल असं नाव आहे. कालेबने आपल्या पत्नीला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला होता. पण तिला मुल हवं होतं. त्यानंतर रशेलने बाळाला जन्म दिला. याच गोष्टीचा राग तिचा पिता कालेबला होता. या दरम्यान 9 ऑगस्टच्या दिवशी रशेल बाथरुममध्ये गेली. यावेळी आरोपी कालेबने बाळाला दोन वेळा दाबलं. त्यानंतर त्याला उचलत हवेत जोरात फेकलं. यामुळे बाळाला घराचं छत लागलं. यामध्ये बाळाला चांगलीच दुखापत झाली.
रशेल बाथरुममधून निघण्याची चाहूल लागल्यानंतर कालेबने त्या बाळाला पुन्हा त्याच्या जागेवर ठेवलं. बाळ तोपर्यंत बेशुद्ध झालेलं होतं. रशेल बाथरुममधून बाहेर आली तर तिला बाळ झोपलंय, असं वाटलं. यानंतर कालेब घराबाहेर पडला. दुसरीकडे बाळाचं शरीर पिवळं पडू लागलं. तसेच त्याचे हात-पाय थंड पडले. त्यानंतर रशेल घाबरली. तिने घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रशेल बाळाला घेऊन रुग्णालयात गेली. पण तोपर्यंत उशिर झाला होता.
बाळाच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या पिता कालेबच्या कृत्याची पोलखोल झाली. पोलिसांनी आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. त्याला कोर्टात दाखल केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आपल्याला मुलावर पैसे खर्च करायचे नव्हते. त्यामुळे त्याची हत्या केली, असं उत्तर त्याने पोलिसांना दिलं. पोलीस त्याची आणखी चौकशी करत आहेत. पोलीस या प्रकरणाता पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय तरुणाची हत्या, धावण्याच्या सरावावेळी चाकूने भोसकलं