Bulli Bai | बुल्लीबाई आणि सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार समोर येताच संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंगळुरु येथून 21 वर्षीय इंजिनिअर तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलं आहे. दरम्यान, या तरुणाच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात 18 वर्षाची श्वेता सिंग या तरुणीचे नाव आता समोर आले आहे. हीच तरुणी बुल्लीबाई अॅप प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी श्वेता सिंग या 18 वर्षीय तरुणीला अटक केलं आहे. ही तरुणी नुकतीच इयत्ता बारावी उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे ती इंजिनिअर प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. तिला पोलिसांनी उत्तराखंड येथील उधमसिंह नगर जिल्ह्यातून अटक केलं आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून अटक केलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या चौकशीतून पोलिसांना या तरुणीची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या मुलीची अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी बुल्लीबाई अॅपमधील कथित मास्टरमाईंड श्वेता सिंह या तरुणीची चौकशी केली आहे. या चौकशीत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. श्वेता सिंग नेपाळमधील एक तरुण तसेच मागील सहा महिन्यांपासून बुल्लीबाई अॅपशी संबंधित काही लोकांच्या संपर्कात होती. त्यांच्या सूचनेनुसार श्वेता सिंगने ट्विटरवर एक फेक अकाऊंट तयार केले होते. बुल्लीबाई अॅपवर अपलोड केले जाणारे मॉर्फ फोटो तसेच इतर कन्टेंट या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले जायचे. ट्विटवर फेक अकाऊंट सुरु केल्याचे सिंग या तरुणीने मान्य केल्याची माहिती मिळतेय.
तरुणीने तिचा सोशल मीडियावर एक मित्र असल्याचे मान्य केले आहे. हा मित्र मूळचा नेपाळ येथील असून त्याच्याकडून तिला वेगवेगळ्या सूचना दिल्या जायच्या. या तरुणाचे नाव जीयू (Giyou) असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिलीय. तसेच बुल्लीबाई अॅपवर अपलोड होणारे कन्टेंट नंतर तिने सुरु केलेल्या ट्विटरच्या फेक अकाऊंटवर टाकण्याचे तिला सांगण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
इतर बातम्या :
Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप
Uday Samant : विद्यापीठ, कॉलेज पुन्हा ऑनलाईन? उदय सामंत निर्णय जाहीर करणार