धक्कादायक! आधी डोक्याचे केस धरून स्लॅपवर आदळलं, नंतर वीटच डोक्यात घातली, युवकाच्या हत्येनं औरंगाबाद हादरलं

| Updated on: Sep 13, 2021 | 9:44 PM

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आरोपी विकास याने महेशचे डोक्याचे केस धरून त्याला स्लॅपवर आदळले. तसेच संदीपने बाजूला बडलेली वीट हातात घेऊन महेशच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले. यात महेशचा मृत्यू झाला.

धक्कादायक! आधी डोक्याचे केस धरून स्लॅपवर आदळलं, नंतर वीटच डोक्यात घातली, युवकाच्या हत्येनं औरंगाबाद हादरलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

औरंगाबाद: वाइन शॉपवर मित्रासोबत गेलेल्या 18 वर्षीय युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder case in Aurangabad) केल्याची घटना औरंगाबादमधील कांचनवाडी (Kanchanwadi murder) परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोन आरोपींनी युवकाचे केस धरून त्याला स्लॅपवर आदळले. तसेच दुसऱ्या एका आरोपीने बाजूलाच पडलेली वीट युवकाच्या डोक्यात घालून हत्या केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आणखी एका मित्रालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली.

दारुसाठी पैसे न दिल्याचे कारण

सदर प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश दिगंबर काकडे (वय वर्षे 18) असे मृत युवकाचे नाव आहे. महेशचे वडील दिगंबर काकडे यांनी या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कांचनवाडीतील वर्षा वाइन शॉपसमोरील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत महेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. महेशने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणामुळे आरोपी विकास रहाटवाड आणि संदीप उर्फ गुजर मुळेकर याने महेशला बेदम मारहाण केली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी विकास याने महेशचे डोक्याचे केस धरून त्याला स्लॅपवर आदळले. तसेच संदीपने बाजूला बडलेली वीट हातात घेऊन महेशच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले. यात महेशचा मृत्यू झाला.

भांडण सोडवणाऱ्या मित्रालाही लाथाबुक्क्या

महेशला मारहाण होताना पाहून हे भांडण सोडवण्यासाठी महेशचा मित्र राहुल गेला. मात्र दोन आरोपींनी राहुल याच्या डोक्यावरही वीट मारली. त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळावरून राहुलने कसाबसा पळ काढल्याने त्याचा जीव वाचला.

वडिलांनी पाहिले.. तो रक्ताच्या थारोळ्यात होता

महेशचे वडील दिगंबर दत्तराव काकडे हे मजुरीचा व्यवसाय करततात. मूळ नांदेडचे रहिवासी असलेले ते नक्षत्रवाडी येथे किरायाने राहत होते. रविवारी रात्री महेश घरी परत न आल्याने वडिलांनी शोधाशोध केली. तेव्हा मित्र राहुलने त्यांना महेश संबंधित इमारतीत असल्याचे सांगितले. राहुलला घेऊन दिगंबर हे घटनास्थळी पोहोचले असता त्यांना महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. दिगंबर यांनी तत्काळ पोलिसात धाव घेतली असता पुढील चौकशीतून सगळा प्रकार उघडकीस आला. दरम्यान सातारा पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. (18 years youngster murdered over petty reasons in Kanchanwadi, Aurangabad)

इतर बातम्या-

Aurangabad Crime: धारदार शस्त्रानं हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली अंघोळ, घटनास्थळही धुऊन काढलं, ढोरकीन गाव पहाटेच हादरलं

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या