नोएडा : दिवाळी सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर दिवाळीची खरेदी करत आहेत. काही लोक बाजारातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. यामुळे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. असाच एक ऑनलाईन फसवणुकीचा (Online Fraud) प्रकार नोएडात उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने ऑनलाईन मिठाई खरेदी (Purchase Online Sweets) केली. मिठाईचे बिल त्याने ऑनलाईन भरले. मात्र मिठाईच्या बिलाच्या नावाखाली त्या व्यक्तीला 2.77 लाखाला गंडा (2.77 Lakh Fraud) घातल्याचे उघडकीस आले आहे.
नोएडातील सेक्टर 27 मधील रहिवासी असलेले नवीन यांना मिठाई खरेदी करायची होती. मात्र यासाठी मिठाई दुकानात रांगेत उभ्या राहण्याऐवजी त्यांनी ऑनलाईन मिठाई खरेदी करायचे ठरवले. मात्र ऑनलाईन मिठाई खरेदी त्याला चांगलेच महागात पडले आहे.
मिठाई ऑर्डर करण्यासाठी त्याने इंटरनेटवर मिठाईची दुकाने सर्च केली. नेटवर सर्च केले असता त्यांना चांदणी चौकातील एका मिठाईच्या दुकानाचा नंबर मिळाला. नवीनने दुकानात फोन करुन मिठाईची ऑर्डर दिली.
मिठाईची ऑर्डर दिल्यानंतर दुकानदाराने मिठाईचे पैसे नवीनला ऑनलाईन देण्यास सांगितले. मिठाईचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दुकानदाने नवीनकडे डिटेल मागितली.
नवीनने डिटेल दिल्यानंतर त्याच्या खात्यातून 2.77 लाख रुपयाचे ट्रान्झेक्शन झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नवीनच्या लक्षात आले. नवीनने तात्काळ पोलीस ठाणे गाठत फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली. नवीनच्या तक्रारीवरुन नोएडा पोलीस प्रकरणाचा तपास करत आरोपीचा शोध घेत आहेत.