ठाणे: सुनेला गोळी मारल्यानंतर फरार झालेला सासरा बिल्डर काशिनाथ पाटील अखेर पोलिसांना शरण आला आहे. सुनेने नाश्ता दिला नाही म्हणून राग आल्याने तिच्यावर गोळी घातल्याची कबुली पाटीलने दिली आहे. सुनेला गोळी घातल्यानंतर पाटील हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी ठाणे (thane) आणि राबोडी पोलिसांनी (rabodi police) दोन विशेष टीम स्थापन केल्या होत्या. तो दोन दिवस ठाणे एसटी स्टँडच्याबाहेर घुटमळत होता. तसेच तो दोन रात्र रिक्षात झोपून होता. पण पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी काशिनाथ पाटील (kashinath patil) यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काशिनाथ पाटील याने त्याची सून सीमा पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी 11.30 वाजता गोळी झाडली. त्याच्याकडील लायसन्स असलेल्या बंदुकीतून त्याने गोळी घातली. त्यानंतर तो फरार झाला होता. तो सुमारे दोन दिवस फरार होता. गुरुवार सकाळपासून ते शनिवारी संध्याकाळपर्यंत तो गायब होता. ठाण्यातील मुंब्रा आणि कौसा परिसरातील अनेक भागात तो दोन दिवस लपत फिरत होता. तो दिवसभर ठाणे एसटी स्टँडजवळ फिरायचा आणि रात्री रिक्षात झोपायचा. दोन दिवस त्याची ही दिनचर्या सुरू होती, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सुनेवर गोळीबार करण्यापूर्वी एक दिवस आधी पाटील यांच्या घरात झगडा झाला होता. यावेळी त्याने घरातील सदस्यांना रिव्हॉल्वर रोखली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार केली असती तर आम्ही काही करू शकलो असतो. पण दुसऱ्याच दिवशी नाश्ता न मिळाल्याने त्याने वेब्ले स्कॉट .32 बोर रिव्हॉल्वरमदून सुनेवर गोळी झाडली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांना त्याच्या कपाटात काही काडतुसांसहीत 12 बोरची आणखी एक बंदूक सापडली. मात्र, बिल्डरकडे लायसन्स आहे. त्याने त्याचे लायसन्स दाखवलं आहे, असंही सांगण्यात आलं.
पोलिसांना या तपासात पाच जिवंत काडतुसे मिळाली आहे. त्यातील तीन काडतुसे रिव्हॉल्वरमध्ये सापडली आहेत. त्यातील एका काडतूस गोळीबार करताना वापरलं आहे. कपाटात आणखी तीन काडतुसे मिळाली आहेत. हा बिल्डर आग लावण्याच्या तयारीत होता, असंही पोलिसांनी सांगितलं.
या बिल्डरने ठाण्यातील राबोडीतील वस्त्यांमध्ये या बिल्डरने दोन ते तीन इमारती बांधल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री पोलीस त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी घेऊन गेले होते. त्याचवेळी त्याच्या अटकेची औपचारिकताही पूर्ण केली जात होती. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याची कसून चौकशी करू, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बिल्डर त्याच्या दोन्ही सुनांना सतत टोमणे मारत असे. घरातील लोक आणि मित्र परिवारांमध्ये सुनांची तक्रार करत असे. आपल्याला सुनांकडून जेवण मिळत नसल्याची तो तक्रार करत असे.
पाटील याच्या या सवयीमुळे त्याच्या घरच्या लोकांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. गुरुवारी सकाळी त्याची मोठी सून सीमा यांनी त्यांना चहा दिली. त्यानंतर रागात येऊन त्याने सुनेवर गोळी झाडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सुनेने चहा दिल्यावर मला नाश्ता का नाही दिला? असा सवाल त्याने केला. त्यानंतर सूनेची आणि त्याची शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या पाटील याने सुनेच्या पोटात गोळी झाडली. त्यामुळे सीमा यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांचा मृ्त्यू झाला होता.
संबंधित बातम्या:
Crime News : खारट नाष्टा दिल्याने पतीने पत्नीचा गळा दाबला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Pune crime : भर वस्तीतून तरुणीच्या हातातला मोबाइल हिसकावला; दुचाकीवरून चोरटे पसार, पाहा CCTV
Nagpur Crime | रामटेकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलीच्या आईने आरोपीस चपलेने बदडले