पुणे – पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या माणकेश्वर व सुकाळवेढ गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 21 शेळ्या त ठार झाल्याची घटना घडली आहे. माणकेश्वर येथील हनुमंत दगडू कोरडे यांच्या 3 शेळ्या बिबट्यांनी ठार केल्या. तर मन सुकाळवेढा येथे दोन बिबट्यांनी केल्या हल्ल्यात महादू ढेंगळे याच्या तब्बल 18 शेळ्या ठार झाल्या आहेत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्नर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.अनेकदा शेतात एकट्याने जाण्यास नागरिक घाबरत आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. जनावरांवर हल्ला केला आता माणसाचा नंबर असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे. तसेच या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजराही लावला आहे. या भागात वनाचे प्रमाण अधिक असल्यने इथे बिबट्यांचा वावर अधिक असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे.
पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर अधिक
जिल्ह्यातील आंबेगाव , शिरूर ,जुन्नर , खेड या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर अधिक असल्याचेसातत्याने समोर येत आहे. अनेकदा ऊस तोडणी कामगार व शेतकऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. काही दिवसांपूर्वी डिंभे धरणाच्या कालव्यात बिबट्याचा बछडा आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी त्यांला वन विभागाच्या हवाली केले होते.
Gold Silver Price Today : सोने खरेदी करणे महागले, नेमकी किंमत किती?
‘उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचे एकही गुण नाहीत, खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
Navi mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवी मुंबईतील स्मारकाचं लोकार्पण, स्मारक जीवनप्रवास उलगडणार