चेन्नई : तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नई विमानतळावर तब्बल 42 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोनं 944 ग्रॅम असून याची अंदाजे किंमत 42 लाखांच्या घरात असल्याची माहिती समोर येत आहे. श्रीलंकेतील कोलंबो आणि दुबईमधील शारजाह येथून चेन्नईमध्ये आलेल्या तीन प्रवाशांकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे. चेन्नई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या वतीने ही करावाई करण्यात आली आहे. सोने तस्करीच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की विमानतळावर नेहमीप्रमाणे तपासणी सुरू होती. याचदरम्यान श्रीलंका आणि दुबईमधून आलेल्या तीन प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे 944 ग्रॅम सोने आढळून आले आहे. हे सोने जप्त करण्यात आले असून, या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हे सोने त्यांनी कुठून आणले, ते भारतामध्ये कोणाला देण्यात येणार होते. सोने तस्करीमध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का? याची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान चेन्नई विमानतळावर सोने जप्त करण्याची ही पहिलीची कारवाई नाही, तर यापूर्वी देखील अनेकवेळा चेन्नई विमानतळावरून भारतामध्ये अवैध मार्गाने येणारे सोने जप्त करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्राने सोन्याच्या आयातीवर मोठा कर लावला आहे. हा कर टाळण्यासाठी भारतामध्ये मोठ्याप्रमाणात सोन्याची तस्करी होते. आता या तस्करीला आळा बसावा यासाठी केंद्राने सोन्यावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्यावरील आयात कर कमी झाल्यास काहीप्रमाणात सोन्याच्या तस्करीला आळा बसून, महसुलात वाढ होऊ शकते असा सरकारचा अंदाज आहे.
Tamil Nadu: Customs officials at Chennai Airport seized 944 gms of gold worth Rs 42.27 lakhs under the Customs Act from the baggage of three passengers who had arrived from Colombo & Sharjah pic.twitter.com/IUIVPsWoOd
— ANI (@ANI) December 26, 2021
Gujrat Crime : गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी असा झाला खुलासा
VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद