यवतमाळ : जिल्ह्यातील वणी शहरातील मोमीनपुरा येथे आज पुन्हा एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ज्वलनशील द्रव्य फेकून हल्ला करण्यात आला. आज दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. गेल्या तीन दिवसातील चिमुकल्यांवर अशा द्रव्य हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही चिमुकले एकाच कुटुंबातील आहे. या सततच्या हल्यामुळे मोमिनपुराच नाही तर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आलेले द्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले होते.
मिळालेल्या माहितीनुसर मोमिनपुरा येथील मशिदीजवळ एक 5 वर्षीय बालक आपल्या पालकांसोबत राहतो. तो आज दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास घराजवळ खेळत होता. दरम्यान एका मोपेडवर एक व्यक्ती दुचाकीने आली व त्यातील एका व्यक्तीने छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्य फेकले. त्यानंतर ते तातडीने तिथून निघून गेले. वरील माहिती माहिती चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी दिली. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा चमू तत्काळ घटनास्थळी दाखल झाला होता.
मोमीनपुरा परिसरात शफीउल्ला खान हे आपल्या परिवारासह राहतात. ते रोजमजुरीचे काम करतात. त्यांना एक 8 वर्षीय मुलगा तर एक 5 वर्षीय मुलगी आहे. शनिवारी त्यांच्या मुलावर व रविवारी त्यांच्या मुलीवर घराजवळ खेळत असताना असाच हल्ला करण्यात आला होता. पहिल्या घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. मात्र सलग दुसरा हल्ला झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. तपासणी केली असता हल्ल्यात वापरण्यात येणारे द्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले. या दोन घटनेनंतर खळबळ अडाली असताना आज शफीउल्ला यांच्या लहान भावाच्या मुलावर नव्याने हल्ला झाला.
या तिन्ही हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जळजळ होत असल्याची माहिती पीडित बालकांच्या कुटुंबीयांनी दिली. सदर घटनेमुळे संपूर्ण मोमिनपुराच नव्हे तर संपूर्ण वणी परिसरात दहशत पसरली आहे. असे हल्ले करून दहशत पसरवणाऱ्या नराधमाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सध्या या प्रकरणी सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे.
इतर बातम्या :