नागपूर : खरं म्हणजे सार्वजनिक स्थळी असो किंवा घरोघरी जाऊन जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात नागपूर पोलीसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमस्थळी जाऊन पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना नागपूर पोलीसांनी नोटिस बाजावली आहे. खरंतर नागपुर शहरात नियमांचे उल्लंघन करतील अशा तृतीयपंथीयांच्या विरोधात थेट खंडणी सारखा गुन्हा दाखल केला जाईल अशा इशाराही नागपुरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. पैसे देण्यासाठी नकार देणाऱ्या व्यक्तींनाही जे तृतीयपंथी धिंगाणा घालून पैशाचा दगादा लावणाऱ्या जवळपास पन्नास तृतीयपंथीयांना 144 अंतर्गत नोटिसा दिल्या जात आहे. एकप्रकारे धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात नागपुर पोलीसांनी कंबर कसली असून पोलीसांच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे.
नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी तृतीयपंथीयांचे जे हक्क आहेत ते यामध्ये आबादीत राहतील याची पूर्ण काळजी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिग्नलवर पैसे मागणे, घरोघरी जाऊन पैसे मागणे, वाढदिवस किंवा इतर शुभप्रसंगी उपस्थित राहून पैशाची मागणी करणे, पैसे देण्यास नकार दिल्यास धिंगाणा घालणे असे प्रकार पोलीसांच्या निदर्शनास आले आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर नागपूर पोलीसांनी ही धडक मोहीम हाती घेतली असून धुमाकूळ घालणाऱ्या तृतीयपंथीयांना नागपूर पोलीसांनी चांगलेच फैलावर घेतले असून नागरिकांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
टाळ्या वाजवून, जोरजोरात आराडाओरड करून पैसे मागीतल्याने अनेकजन नाईलाजास्तव पैसे देऊन टाकतात, मात्र अनेकदा हे तृतीयपंथी नसल्याचे समोर आले आहे.
तृतीयपंथीयांचा आशीर्वाद मिळाला की तो चांगला असतो अशी भावना अनेकांच्या मनात असते, तीच संधी ओळखून अनेक तृतीयपंथी लग्नसोहळा, बारसे, उत्सव, स्नेहसम्मेलन, धार्मिक कार्यकम किंवा मृत्यू प्रसंगी घरात शिरतात.
पैशांसाठी अक्षरशः तगादा लावतात, अर्वाच्य भाषा, शिवीगाळ आणि गुटखा पान खाऊन त्रास होईल असे कृत्य करत असतात त्यामुळे अनेक जन पैसे देऊन मोकळे होतात पण आता नागपूर पोलीसांनी याचबाबत धडक मोहीम हाती घेतली आहे.