पुणे- शहरातील सायबर गुन्हेगारीच्या(cybar crime) प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.सायबर गुन्हेगार चोरी करण्यासाठी सातत्याने नवनवीन शक्कला लढवत असतात. अशातच औंधमधील गणेशाखिंड परिसरात सायबर गुन्ह्याची घटना ताजी असतानाच सायबर गुन्ह्याचे आणखी एका प्रकरण उघडकीस आले आहे. कोंढवा (kondhva) परिसरातील जेष्ठ नागरिकाला तब्बला पाच लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी उंड्री(undri) येथींना ५७ वर्षाच्या व्यक्तीने कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या पीडित व्यक्तीला चोरट्यांनी त्यांचे बँक खाते ब्लॉक केल्याचा मेसेज पाठवला. त्याचबरोबर एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करण्यास सांगितले. लिंक ओपन करुन नेट बँकिंग अपडेट करण्यास सांगत त्यांचा पॅनकार्ड क्रमांक टाकण्यास सांगितले. त्यानुसार पीडित व्यक्तीने चोरट्याने दिलेल्या लिंकवर जाऊन नेट बँकिंग अपडेट करत पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर काही वेळातच पीडितांच्या बँक खात्यावरुन तब्बल ५ लाख ४ हजार ३४२ रुपये वेगळ्याच अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाले.
पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितांच्या लक्षात येताच पोलिसातधवा घेत त्याने तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात फसवणूकच गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक राऊत करत आहेत.
हेही वाचा:
जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली