अनैतिक संबंधावरुन दोन मित्रांमध्ये राडा, मग प्रियकराने प्रेयसीच्या पतीसोबत जे केले ते भयंकर !

| Updated on: Jun 07, 2023 | 5:05 PM

मित्राला भेटायला गेलेला तरुण अचानक बेपत्ता झाला. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर कुटुंबीयांनी पोलिसात तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता जे समोर आलं ते भयंकर होतं.

अनैतिक संबंधावरुन दोन मित्रांमध्ये राडा, मग प्रियकराने प्रेयसीच्या पतीसोबत जे केले ते भयंकर !
अनैतिक संबंधातून मित्राने मित्राला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अनैतिक संबंधाच्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा पती आणि त्याच्या जिवलग मित्राचा काटा काढल्याची घटना मुंबईतील कांदिवलीत उघडकीस आली आहे. कांदिवली पूर्व समता नगर पोलिसांनी अखेर या हत्याकांडाची उकल केली आहे. मित्राची हत्या करून मृतदेह मुंबईला लागून असलेल्या काशिमीरा जंगलात नेऊन पुरण्यात आला होता. दिनेश प्रजापती असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिनेश 2 जूनपासून बेपत्ता होता

दिनेश प्रजापती हा कांदिवलीतील समता नगर परिसरात पत्नीसोबत राहत होता. दिनेश 2 जून 2023 पासून बेपत्ता होता. याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांना त्याचाच मित्र सुरेश कुमावत याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृतकाने आरोपी सुरेश कुमावत याला 1 जून रोजी बोरिवली पूर्व राजेंद्र नगर येथे भेटायला बोलावल्याचे निष्पन्न झाले. पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत यावेळी दोघांचे बोलणे झाले आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. त्यानंतर दोघेही मित्राच्या खोलीत गेले आणि आरोपीने मृताच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.

हत्या करुन आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न

हत्येनंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी आधी निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या 4 ते 5 पोत्यात भरला. मग त्याचा मृतदेह एका मोठ्या गोणीत ठेवल्यानंतर तो अॅक्टिव्हामधून काशिमीरा जंगलात नेऊन तिथेच खड्ड्यात पुरला. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी आरोपीने आत्महत्या असल्याचे सिद्ध करण्यासाठी जंगलाचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मृताच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या नातेवाईकांना पाठवला. व्हिडिओखाली खाली ‘राम राम माझ्या चुका माफ करा’, असा संदेश दिला होता.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या चौकशीत आरोपी सुरेश कुमावतने सांगितले की, लग्नापूर्वी मृताच्या पत्नीशी त्याचे प्रेमसंबंध होते, ही बाब दिनेशला समजली. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले आणि यातून त्याने दिनेशची हत्या केली. या हत्येचे गूढ उकलत पोलिसांनी दिनेशचा मृतदेह खड्ड्यातून काढून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. आता कस्तुरबा मार्ग पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास करत आहेत.