रांची : झारखंडमधील घरकाम करणाऱ्या महिलेच्या अत्याचार (Torture) प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा (Revealed) झाला आहे. मोलकरणीची मदत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी भाजप नेत्या सीमा पात्राने आपल्या मुलाला मनोरुग्णालयात दाखल केल्याचे उघड झाले आहे. सीमा पात्रा (Seema Patra) यांचा मुलगा आयुष्मानने ही बाब आपल्या सरकारी अधिकारी असलेल्या मित्राला सांगितली. मित्रासोबत व्हिडिओ शेअर करून मदत मागितली. यानंतर आयुष्यमानचा मित्र विवेक आनंद बस्के याने पोलिसात तक्रार दिली आणि पीडितेची सुटका झाली.
मोलकरणीचा छळ करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी आपण निर्दोष असून आपल्याला फसवले जात असल्याचे सीमा पात्रा यांनी दावा केला आहे.
सीमा पात्रा यांनी आपल्या मोलकरणीला अनेक दिवस उपाशी ठेवलं. लोखंडी रॉडने मारहाण करत तिचे दात तोडले. सीमा पात्रा यांच्या मुलामुळेच हा खुलासा झाला आहे. पीडित मोलकरीण गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासाठी घरकाम करत होती.
अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी सीमा पात्रा यांना भाजपने निलंबित केले. पात्रा या भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या आणि त्यांचे पती महेश्वर पात्रा हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेची सुटका करत तिला राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल केले आहे. सध्या पीडितेवर उपचारा सुरु आहेत.
पीडितेला लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करण्यात येत होती. तिचे दातही तोडण्यात आले आहेत. तिला उठताही येत नव्हते. तिला अनेक दिवस अन्न किंवा पाणी दिले गेले नाही. आयुष्मानने तिला वाचवल्याचे पीडितेने सांगितले. (A new revelation in Jharkhand maid abuse case)