नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई ( ACB Action ) केली आहे. राज्यात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याचेही बोललं जात आहे. पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीच्या संचालकाला अटक होणार आहे. नाशिक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या धुळे येथील लळिंग टोल प्लाझा च्या वित्तीय अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हरिश सत्यवली यांना 32 लाख रुपयांचा परताव्यासाठी सात लाखांची लाच स्वीकारातांना ( Bribe ) अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच कंपनीच्या संचालकांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचा पुरावा तक्रारदाराने दिल्याने त्यांच्या अटकेसाठीही पथक रवाना झाले आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक दिल्लीकडे रवाना झाले असून इरकॉन सोमा टोल वे प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रदीप कटियार यांना अटक करून नाशिकमध्ये चौकशीसाठी आणण्यात येणार आहे.
खरंतर खाजगी कंपनीच्या विरोधात पहिल्यांदाच अशी कारवाई होत आहे. त्यामध्ये लोकसेवक व्याख्येचा आधार घेत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारांनी ही कारवाई सुरू केली आहे.
सप्टेंबर 2005 पासून इरकॉन सोमा टोल वे प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी टोल वसुलीचे कंत्राट घेतले आहे. त्यात भारतीय जनतेचा पैसा घेत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
याच इरकॉन सोमा टोल वे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने राजस्थानच्या कोरल असोसिएट्स या कंपनीला ऑगस्ट २०२२ पासून चांदवड टोल प्लाझाचे काम दिले आहे. त्यांच्याकडून चांदवाद टोलवर व्यवस्थापन केले जात आहे.
राजस्थानच्या कोरल असोसिएट कंपनीच्या परताव्याचे जवळपास 32 लाख रुपये घ्यायचे होते. त्यासाठी कंपनीकडून पाठपुरावा सुरू होता. त्याच दरम्यान इरकॉन सोमा टोल वे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वित्तीय अधिकारी यांच्याशी बोलणं सुरू होतं.
त्याचवेळी त्यांनी 32 लाख रुपयांचा परतावा मिळेल पण त्यासाठी सात लाख रुपयांची लाच स्वीकारतांना त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आता इरकॉन सोमा टोल वे प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रदीप कटियार यांचाही सहभाग असल्याचे समोर आहे.
नाशिक आणि धुळ्याचे पथक प्रदीप कटियार यांना अटक करण्यासाठी रवाना झाले असून नशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आणि धुळ्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
त्या लोकसेवक या व्याख्येत बसवून पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने दिल्ली पर्यन्त या कारवाईचा धसका अधिकाऱ्यांनी घेतल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.