Indore Murder : बर्थडे पार्टीतील वाद आणि सोशल मीडियावरील टीकेनंतर समझोत्यासाठी भेटले अन् हत्या करुन फरार झाले

| Updated on: Aug 29, 2022 | 2:14 AM

सुमित उर्फ ​​लकीचा वाढदिवस साजरा करत असताना किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. यानंतर, इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद पुन्हा वाढला.

Indore Murder : बर्थडे पार्टीतील वाद आणि सोशल मीडियावरील टीकेनंतर समझोत्यासाठी भेटले अन् हत्या करुन फरार झाले
अंधेरी परिसरात भावोजीने मेव्हण्याला संपवले
Image Credit source: tv9
Follow us on

मध्य प्रदेश : इंदूरमध्ये दोन गटात झालेल्या भांडणात एका तरुणाची चाकूने वार करून हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. डिस्टर्बन्स पुलाजवळील एबीसीडी मल्टी आणि महादेव नगर येथे राहणाऱ्या दोन गटात झालेल्या किरकोळ वादा (Dispute)त एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. राजा असे मयत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधी बर्थडे पार्टी आणि नंतर सोशल मीडिया पोस्टवर केलेल्या कमेंट्सनंतर दोन गटात मारामारी झाली. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सामंजस्याने वाद सोडवण्यासाठी भेटले आणि हत्या केली

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित उर्फ ​​लकीचा वाढदिवस साजरा करत असताना किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. यानंतर, इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद पुन्हा वाढला. हा वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी दोन्ही गटातील सदस्य एबीसीडी मल्टीमध्ये एकमेकांना भेटले. बोलणे सुरू असतानाच नसीब खान याने त्याचा भाऊ अजिबी खान व अन्य साथीदारांसह दुसऱ्या गटातील राजा, सुमित, अरुण व इतरांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात राजाचा चाकूने वार करून मृत्यू झाला असून, दोन्ही गटातील 50 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. खून केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

राजेंद्र नगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच राजेंद्र नगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये नेले आणि राजा याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू झाला आहे. या प्रकरणी राजेंद्र नगर एसीपी रुबिना यांनी सांगितले की, या हत्याकांडातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या सोशल मीडियावरील पोस्टवर कमेंट केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य कारण जाणून घेण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. (A youth was killed in a minor dispute between two groups in Indore Madhya Pradesh)

हे सुद्धा वाचा