आईची स्क्रुड्रायव्हरने हत्या, अडीच वर्षांपासून फरार, शेअर मार्केटचं वेड लागलेल्या ‘त्या’ तरुणाला अखेर बेड्या

| Updated on: Sep 21, 2021 | 4:56 PM

आईची हत्या तसेच वडिलांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुलाला तब्बल अडीच वर्षानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नालासोपारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक बाबींच्या आधारे पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आलंय.

आईची स्क्रुड्रायव्हरने हत्या, अडीच वर्षांपासून फरार, शेअर मार्केटचं वेड लागलेल्या त्या तरुणाला अखेर बेड्या
RAIGAD CRIME
Follow us on

पालघर : आईची हत्या तसेच वडिलांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुलाला तब्बल अडीच वर्षानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नालासोपारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक बाबींच्या आधारे पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आलंय. अटक आरोपीला वसई न्यायालयाने 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (absconded accused son arrested from west bengal by palghar police who murdered his mother)

शेअर मार्केटमध्ये झाले होते मोठे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जन्मेश पवार आई नम्रता पवार (वय 50) तसेच नरेंद्र पवार (वय 53) हे कुटुंब नालासोपारा पश्चिम पाठणकर पार्क येथील इंपेरियल टॉवरमध्ये राहत होते. जन्मेश हा नम्रता आणि नरेंद्र पवार यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो शेअर मार्केटमध्ये पैसे लावत होता, पण यामध्ये त्याला यश येत नव्हते. शेअर मार्केटिंकमध्ये पैसा गुंतवल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले होते.

धारदार शस्त्र तसेच स्क्रुड्रायव्हरने आई-वडिलांवर हल्ला

याच कारणामुळे त्याचा आणि वडिलांचे घरात वाद झाला होता. याच वादातून 29 जानेवारी 2019 मध्ये जन्मेशने धारदार शस्त्र तसेच स्क्रुड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला होता. मुलगा आणि वडिलांचे भांडण सुरु असताना मध्ये आई आली होती. यावेळी रागाच्या भरात आरोपी जन्मेशने त्याच्या आईवरदेखील वार केले होते. यातच त्याचा आईचा मृत्यू झाला होता. तर वडील गंभीर जखमी झाले होते.

पुरावा न सोडता घरातून गेला होता पळून

आपल्या हातून मोठा गुन्हा घडल्याचे समजताच आईचा मृतदेह आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना राहत्या घरातच सोडून आरोपी जन्मेश घटनास्थळावरुन पसार झाला होता. यावेळी कोणताही पुरावा न सोडता तो बॅग घेऊन पळून गेला होता. त्यानंतर हत्या, प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील अडीच वर्षांपासून पोलीस या आरोपीचा सोध घेत होते. आरोपीने कोणताही सोडला नसल्याने त्याला पकडणे कठीण जात होते.

 शेवटी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या 

मात्र शेवटी आरोपी जन्मेश हा पश्चिम बंगाल येथे असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून सर्व तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केले आहे. पोलीस जन्मेशची चौकशी करत आहेत. मात्र, तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपीला बेड्या ठोकल्यामुळे पोलिसांची वाहवा केली जात आहे. तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याची गरजही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

धक्कादायक ! पॅराफीन, सोयाबीन तेल मिसळून दुधाची विक्री, नाशिकमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल

पैलवानांच्या मदतीने साडेसात किलो सोन्याची लूट…तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज…चोरों का राजा नाशिकचा

इलेक्ट्रिक हिटर छातीला कवटाळून आयुष्य संपवलं, विवाहितेच्या आत्महत्येने पुणे हादरलं

(absconded accused son arrested from west bengal by palghar police who murdered his mother)