सोलापूर : सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावाजवळ आज दुपारी अपघात झाला आहे. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. सांगोला तालुक्यातील (Sangola accident) नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलीचा अपघात झाला.
अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सांगोला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली करण्यात आली आहे.
शहाजी पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडीला (एमएच १४, डीएम ९४४०) अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही जखम झाली नाही. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास माळवाडी-नाजरा येथे घडली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार पाटील नाजरा येथे आयोजित शिबिरासाठी गेले होते. तिथून सांगोला शहराकडं परत येत असताना पोलिसांची एक संरक्षक गाडी होती. या संरक्षक गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक दुचाकी धडकली. अपघातातील जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. सांगोला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांची गाडी ही स्कार्पिओ होती. स्कार्पिओ आणि दुचाकी समोरासमोर धडकल्या.
घटनेनंतर घटनास्थळी मोटारसायकल पडली होती. पोलिसांनी त्यांची गाडी जागीच थांबविली. त्यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. (Accident to car in Shahajibapu Patil’s convoy; What exactly happened in the accident?)