अमरावती – आरोपींनी रागाच्या भरात पोलिसांवरती (Police) अनेकदा हल्ले केले आहेत. अमरावतीमध्ये (Amravati) चक्क चौकशीसाठी बोलवल्याने आरोपींनी महिला “एपीआय”चा (API) गळा दाबला आहे. ही घटना राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. त्या पोलिस स्टेशनमध्ये महिला एपीआय आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिस स्टेशनमधील कर्मचारी हादरून गेले आहेत. आरोपींवरती पैसे लुटल्याचा आरोप आहे. त्यांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. तिथं महिला अधिकारी आणि आरोपींमध्ये वादावादी झाली. त्यावेळी दोन महिला आणि दोन पुरूषांनी एपीआयचा गळा दाबून मारहाण केली आहे.
नेमकं काय घडलं
एपीआय प्रियंका कोठेवार यांनी बाबू चुडे यांच्यासह तीन आरोपींना चौकशीसाठी बोलावलं होत. अमरावतीच्या राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये आरोपीची चौकशी सुरू होती. आरोपी आणि एपीआय यांच्यात त्यावेळी बाचाबाची झाली. काहीवेळाने चार आरोपींनी एपीआयचा गळा दाबला. तसेच त्यांना मारहाण देखील केली आहे. आरोपींनी इतरांचे पैसे लुटले असल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. आरोपी बाबू चुडेसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. बाबू चुडे अवैध दारू विक्रेता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस स्टेशन मधील पोलिसच सुरक्षित नाही का असा सवाल स्थानिक नागरिकांना पडला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास लावून आत्महत्या
अमरावतीतील मध्यवर्ती कारागृहाच्या मागच्या बाजूस असलेल्या, झाडाला पोलिस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. विजय आडोकार असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. बदलीवरून मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांनी पोलिस अधिकाऱ्यांवरती आरोप केला होता.
तक्रारीत वलगाव पोलीस निरीक्षकानी बदलीसाठी त्रास दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.