बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका कथित गुन्ह्यामुळे खळबळ उडाली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची कोणी हत्या केली असेल याबाबत कुजबूज सुरु होती. पोलीसही गुन्हेगाराचा शोध घेताना हतबल झाले होते. पण गुन्हेगार गुन्हा करताना काही ना काही पुरावा सोडून जातो हे देखील तितकंच सत्य आहे. त्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मागोवा घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दातांच्या व्रणावरून आरोपीचा शोध घेतला आणि गुन्ह्याची उकल झाली. मृत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलानेच हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पैशांच्या हव्यासापोटी वडिलांचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी राजूला दारु पिण्याचं व्यसन होतं. त्याच्या सवयीमुळे त्याला पैसे कोणीही पैसे देत नव्हतं. इतकंच काय तर हाती आलेले पैसे तो दारूत घालवायचा. त्याच्या रोजच्या सवयीमुळे घरचेही वैतागले होते. एक दिवस त्याने दुकान खोलण्यासाठी वडिलांकडे 10 लाख रुपये मागितले होते. मात्र वडिलांनी त्याला पैसे दिले नाही. त्या उलट बहिणीला 5 लाख रुपये दिले. मात्र त्याला न दिल्याने राग आला होता. अखेर त्याच रात्री दारु नशेत त्याने वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. राजूने दाताने वडिलांच्या छातीवर आणि कमरेवर चावा घेतला.तसेच त्यांची हत्या केली.”
मृत महावीर सिंह यांचा मृतदेह शेतीजवळील टूबवेल जवळ आढळला होता. गावकऱ्यांनी हत्येचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. व्याजाचे पैसेन न दिल्याने शेजारील गावातील लोकांनी हत्या केली असावी अशी मोघम माहितीही दिली होती. पोलिसांनी सूत्र हलवतं तपासाला सुरुवात केली. मात्र गुन्हेगारापर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं. अखेर पोलिसांनी शरीरावरील दातांचे व्रण तपासणीसाठी पाठवले. तपास करताना पोलिसांना घरच्यांवर संशय आला.
घरच्या व्यक्तींवर पोलिसांना संशय असल्याने प्रत्येकाच्या दाताच्या खुणा तपासासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवल्या. अखेर फॉरेंसिक लॅबमधून आलेल्या रिपोर्टमध्ये दाताचे व्रण मुलाचे असल्याचे स्पष्ट झालं. मात्र तरीही तो गुन्हा कबुल करण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांचा खाक्या पाहून राजूने गुन्ह्याची कबुली दिली.