गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मोबाईल चोरला, पण अडीच मिनिटात आरपीएफ कर्मचाऱ्याने मुसक्या आवळल्या

| Updated on: Jul 07, 2023 | 5:55 PM

रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या घटनांना आळा घालणे हे मोठे आव्हान आहे.

गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मोबाईल चोरला, पण अडीच मिनिटात आरपीएफ कर्मचाऱ्याने मुसक्या आवळल्या
जमिनीच्या वादातून मुलाच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले
Follow us on

उल्हानसनगर : रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत मोबाईल, मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना आज उल्हासनगर रेल्वे स्थानकात घडली. गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. मात्र प्रवाशाच्या तात्काळ ही बाब लक्षात आली. प्रवाशाने आरडाओरडा केल्याने तेथे उपस्थित आरपीएफ महिला कर्मचाऱ्याने घटनेनंतर अडीच मिनिटात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी कल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. शेख फरीद अली असे आरोपी नाव आहे, तो मुंब्रा येथील रहिवासी आहे.

आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यामुळे चोरटा अटक

सकाळी 9.57 वाजता अंबरनाथवरून सीएसटीएमकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये सिद्धेश चव्हाण हा तरुण चढला. यावेळी गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने त्याचा मोबाईल चोरला. मात्र मोबाईल खेचल्याचे तात्काळ लक्षात येताच सिद्धेशने आरडाओरडा केला. यामुळे इतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनीही आरडाओरडा सुरु केला. याच दरम्यान ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफच्या महिला आरक्षक नीता माजी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी त्या चोराला पकडून पुढील कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा