सोशल मीडियावर शस्त्रांचे फोटो अपलोड करून भाईगिरी करणे पडणार महागात, पोलिसांचा मोठा निर्णय

| Updated on: Dec 30, 2024 | 7:56 PM

Crime News: कोणी अवैध शस्त्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांना अटक करण्यात येईल. वर्षभरात तीन ते चार जणांवर कारवाई झाली. त्या लोकांना अटक करुन तडीपार किंवा मोकाची कारवाई केली आहे.

सोशल मीडियावर शस्त्रांचे फोटो अपलोड करून भाईगिरी करणे पडणार महागात, पोलिसांचा मोठा निर्णय
फाईल फोटो
Follow us on

Crime News: तरुणाईमध्ये सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. लाईक अन् कमेंट किती आल्या त्यावरुन आपण किती प्रसिद्ध आहोत, हे काही तरुण ठरवत असतात. मग त्यासाठी भाईगिरी करणारे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. परंतु आता असे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणे चांगलेच महागात पडणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर भाईगिरी करणारे फोटो दिसल्यास कारवाई होणार आहे. जालनाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी माहिती दिली.

जालना पोलीस ॲक्शनमोडवर

जालन्यात शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केल्यास कारवाईचा इशारा जालना पोलिसांनी दिला आहे. अवैध शस्त्र बाळगने, स्टाईलबाजी करणे आणि धाक दाखवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर जालना जिल्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. जालन्यात बंदूक आणि तलवारीचे स्टेटस टाकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यासाठी जालना पोलीस ॲक्शनमोडवर आले आहेत.

पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन

देशीकट्टा, पिस्तूल असो किंवा मोठा चाकू आणि खंजिर या शस्त्राचे सोशल मीडियावरती पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात कोणी अवैध शस्त्र बाळगत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी केल आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शस्त्रांचे फोटो अपलोड करून भाईगिरी करणे आता चांगलेच महागात पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले की, कोणी अवैध शस्त्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांना अटक करण्यात येईल. वर्षभरात तीन ते चार जणांवर कारवाई झाली. त्या लोकांना अटक करुन तडीपार किंवा मोकाची कारवाई केली आहे. तसेच परवानाधारक शस्त्रासोबत फोटो काढून समाजात दहशत निर्माण करणे गुन्हा आहे. शस्त्राचा परवाना स्वसंरक्षणासाठी दिला आहे. परंतु त्याचा गैरवापर करणाऱ्यांचा परवाना रद्द करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे बंसल यांनी सांगितले.