धक्कादायक, लग्नानंतर 13 वर्षापर्यंत प्रोफेसरला कसं समजलं नाही त्याची पत्नी मुस्लिम? कशी झाली पोल-खोल?

| Updated on: Jun 29, 2024 | 2:02 PM

सध्या पोलिसात एक प्रकरण पोहोचलय. पोलीस याची चौकशी करत आहेत. लग्नानंतर 13 वर्षांनी प्रोफेसरला त्याची पत्नी मुस्लिम असल्याच समजलं. इतकी वर्ष हे सत्य कसं लपवलं? आता इतक्या वर्षांनी पोल-खोल कशी झाली? जाणून घ्या.

धक्कादायक, लग्नानंतर 13 वर्षापर्यंत प्रोफेसरला कसं समजलं नाही त्याची पत्नी  मुस्लिम? कशी झाली पोल-खोल?
marriage
Follow us on

एका प्रोफेसरने आपल्या पत्नीवर फसवणुकीचा आरोप करत FIR नोंदवलाय. प्रोफेसरला आता पत्नीपासून घटस्फोट हवाय. पत्नीचा आधीच दुसऱ्या कोणाबरोबर विवाह झाला होता. पहिल्या पतीसाठी तिने धर्म परिवर्तन केलं होतं, असा आरोप या प्रोफेसरने केलाय. 13 वर्षांपूर्वी अविवाहित आहे, असं दाखवून माझ्याशी विवाह केला. घरात भांडण करुन आईपासून मला वेगळं व्हायला लावलं असा आरोप त्यांनी पत्नीवर केलाय. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील सेंट्रल यूनिवर्सिटीमध्ये हे प्रोफेसर काम करतात.

पोलीस तक्रार करताना प्रोफेसरने पत्नीशिवाय मेहुणी आणि सासूवर छळ, अपमानाचा आरोप केलाय. विवाहानंतर 13 वर्षांनी पत्नी आणि तिच्या माहेरच्यांवर छळ, अपमानाचा आरोप करत FIR नोंदवलाय. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्रयागराज येथील सेंट्रल यूनिवर्सिटीमध्ये शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.

’13 वर्ष काही समजलं नाही’

“13 वर्षापूर्वी माझं लग्न आसामच्या एका युवती बरोबर झालं. आमच लग्न होण्याआधी माझ्या पत्नीने एका मुस्लिम युवकासोबत लग्न केलं होतं. त्याला सोडल्यानंतर अविवाहित आहे असं दाखवून माझ्याशी लग्न केलं. मला तिच्या पहिल्या लग्नाबद्दल 13 वर्ष काही समजलं नाही” असं या प्रोफेसरने सांगितलं.

खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी

पत्नी आपल्याशी खोटं बोलली. यात तिचे कुटुंबीय सुद्धा सहभागी होते. सर्वांनी मिळून पहिल्या लग्नाच सत्य लपवून तिचा विवाह लावून दिला. लग्नानंतर पती-पत्नी दोघांचे संबंध चांगले नव्हते. या दरम्यान पत्नीने सासू बरोबर इतका वाद घातला की, प्रोफेसरला त्याच्या आईपासून वेगळ व्हाव लागलं. एक महिन्यापूर्वी कपाटात पत्नीची काही कागदपत्र मिळाली. ती पाहिल्यानंतर प्रोफेसरला धक्का बसला. तिच्या पहिल्या लग्नाबद्दल समजलं. त्यांनी या बद्दल पत्नीला विचारलं, तेव्हा तिने खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. याला कंटाळून प्रोफेसरने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.