जयपूर : राजस्थानच्या डुंगरपूरमधून हैराण करणार एक प्रकरण समोर आलय. महिला गुजरातच्या एक युवकासोबत कुवेतला निघून गेली. महिलेच्या कुटुंबीयांनी डुंगरपूरच्या एसपीना ही माहिती दिलीय. महिलेला कुवेतहून परत आणण्यासाठी याचना केलीय. चितरी ठाणा क्षेत्रातील ही घटना आहे. महिलेच नाव दीपिका आहे. पोलीस अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितलं की, महिलेच्या कुटुंबीयांनी महिन्याभरापूर्वी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. महिलेचा बुर्ख्यामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कुटुंबीयांना या बद्दल समजलं.
फोटोमधील महिलेच नाव दीपिका आहे. 14 वर्षांपूर्वी आमच लग्न झालं होतं, असं महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितलं. लग्नानंतर तिला दोन मुलं झाली. यात एक मुलगा आणि मुलगी आहे. नवरा मुंबईत नोकरी करायचा.
कुटुंबीयांनी तिला जास्त प्रश्न विचारले नाही, कारण…
मागच्या महिन्यात 10 जुलैला पत्नीने कुटुंबीयांना सांगितलं की, तिची तब्येत बिघडली आहे. ती गुजरातला गेलीय. कुटुंबीयांनी तिला जास्त प्रश्न विचारले नाहीत, कारण याआधी सुद्धा ती खेड़ ब्रम्हा येथे जायची.
फोटोत महिलेसोबत असलेल्या व्यक्तीच नाव काय?
महिलेच्या पतीने सांगितलं की, 10 जुलैनंतर त्याने अनेक फोन केले. पण तिने फोन उचलला नाही. सोशल मीडियावर पत्नीचा बुर्ख्यामधील फोटो व्हायरल होतोय. त्यात ती इरफान नावाच्या व्यक्तीसोबत दिसतेय. इरफान गुजरातचा राहणार आहे.
नवऱ्याचे आरोप काय?
इरफान आपल्या बायकोला फसवून कुवैतला घेऊन गेलाय असा आरोप महिलेच्या पतीने केलाय. बायकोच धर्म परिवर्तन केलय. तिचं वय 35 वर्ष आहे. टीव्ही 9 व्हायरल फोटोच्या सत्यतेची पुष्टि करत नाहीय.
चितरी थाना प्रभारी गोविंद सिंह यांच्यानुसार, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. महिला बेपत्ता असल्याची तक्रार आधीच नोंदवण्यात आली आहे. महिलेला अखेर कुवैतचा व्हिसा कसा मिळाला ? याचा पोलीस तपास करतायत. याआधी राजस्थानची अंजू प्रियकरासाठी भारतसोडून पाकिस्तानात निघून गेली.