नंदुरबारमध्ये बदलापूरची पुनरावृत्ती टळली, त्या मुलीला शाळेतील सफाई कामगाराने…

| Updated on: Aug 28, 2024 | 6:08 PM

नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचे देखील सफाई कामगारांकडून सांगण्यात आले होते.

नंदुरबारमध्ये बदलापूरची पुनरावृत्ती टळली, त्या मुलीला शाळेतील सफाई कामगाराने...
Follow us on

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर शाळेतील सफाई कामगाराने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. त्या प्रकारामुळे राज्यात खळबळ माजली. बदलापूरकरांनी तब्बल नऊ तास रेल रोके आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली. आरोपीला अटक झाली. उशिरा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयसमोर ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त होत असताना नंदुरबारमधील शाळेत असाच प्रकार होणार होता. परंतु त्या मुलीच्या सजगतेमुळे हा प्रकार टळला. नंदुरबारमधील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मोबाईलमध्ये दाखवला अश्लिल व्हिडिओ

नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचे देखील सफाई कामगारांकडून सांगण्यात आले होते. त्या विद्यार्थिनीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान हा प्रकार शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. शाळेकडून सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

शाळेची होणार चौकशी

नंदुरबार शहरातील शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये आपल्या विद्यार्थिनी विषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे.

बदलापूरनंतर नंदुरबारमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलीस शाळेची देखील झाडाझडती घेणार आहे. शाळेचा दोष आढळल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल होणार आहे.