बेरोजगारीला कंटाळलेल्या एका युवकाने गळफास घेऊन जीवन संपवलं. माहेरी असणाऱ्या पत्नीला जेव्हा नवऱ्याच्या मृत्यूबद्दल समजलं, तेव्हा तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पती-पत्नी दोघांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. नवरा मागच्या दोन वर्षांपासून नोकरी शोधत होता. तो बिहारचा राहणारा आहे. काही काळापासून तो पत्नीसोबत तिच्या माहेरी राहत होता.
हरीश असं मृताच नाव असून तो बिहार बाढचा राहणारा होता. पत्नी संचिता गोरखपुरच्या प्रसिद्ध डॉक्टरची मुलगी होती. वाराणसीच्या राजघाट येथील प्रतिष्ठीत शाळेत शिक्षण घेताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. MBA केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. हरीशला मुंबईच्या प्रायवेट बँकेत नोकरी लागली. तिथे चांगलं पॅकेज मिळालं त्याला. दोघे मुंबईला रहायचे.
लाईफ स्टाइलमुळे खर्च वाढू लागला
मुंबईत असताना संचिताची तब्येत बिघडली. तिचे वडिल तिला गोरखपुरला घेऊन आले. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते. काही महिन्यांनी हरीश सुद्धा नोकरी सोडून गोरखपुरला आला. तो सुद्धा पत्नीसोबत तिच्या माहेरी राहत होता. मागच्या दोन वर्षांपासून तो नोकरीच्या शोधात होता. नशेची सवय त्याला जडली होती. लाईफ स्टाइलमुळे खर्च वाढू लागला. 5 जुलैला हरीश पाटना येथे जायचं आहे सांगून, गोरखपूरहून निघाला. पण पाटण्याऐवजी तो वाराणसीला पोहोचला. एका होम स्टे मध्ये तो मुक्कामाला थांबला होता.
त्यावेळी तिथे हरीशला फोन केला
हरीशने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्याने होम स्टे ची ऑनलाइन खोली बुक केली. शुक्रवारी रात्री 8 वाजता त्याने चेक इन केलं. त्याने ऑनलाइन जेवण मागवलं. पत्नी संचिता जेव्हा समजलं, नवरा बिहारला न जाता वाराणसीला गेला? त्यावेळी तिथे हरीशला फोन केला. पण त्याने कॉल रिसीव केला नाही.
एका नातेवाईकाला फोन करुन सगळं सांगितलं
ती सतत त्याला फोन करत होती. पण समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता. कुटुंबीय त्रस्त झाले. त्यांनी एका नातेवाईकाला फोन करुन सगळं सांगितलं. हरीश जिथे थांबलेला, तिथला पत्ता दिला. नातेवाईक होम स्टे मध्ये पोहोचला, त्यावेळी हरीशच्या आत्महत्येची माहिती मिळाली.
ती पळत घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेली
शनिवारी संचिताच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. रविवारी सकाळी संचिताच्या वडिलांनी तिला हरीशच्या मृत्यूबद्दल सांगितलं. पतीच्या मृत्यूच्या बातमीने संचिताला मोठा धक्का बसला. तिने घराच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. संचिताच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. पोलिसांसमोर हा प्रश्न आहे की, पाटण्याला निघालेला हरीश वाराणसीला का पोहोचला?