नाशिक : विमान कंपनीला विमान रद्द करणे चांगलेच महागात पडले आहे. ऐनवेळी विमान रद्द केल्याने एका प्रवासी दाम्पत्याने विमान कंपनीला चांगलाच धडा शिकवला आहे. विमान रद्द केल्याने गैरसोय झाली आणि त्यामुळे विवाह सोहळ्याला उपस्थित राहता न आल्याने आणि गैरसोय झाल्याने विमान कंपनीच्या विरोधात प्रवाशाने ग्राहक न्याय मंचात धाव घेतली होती. प्रवाशाच्या बाजूने ग्राहक न्याय मंचाने निकाल दिला असून प्रवाशाला नुकसान भरपाई म्हणून अडीच लाख रुपये देण्याचे आदेश काढले आहे. या निर्णयामुळे विमान कंपनीला चांगलाच भुर्दंड बसला असून प्रवाशाला अडीच लाख रुपये आता द्यावे लागणार आहे. नाशिकमधील शाह यांनी ग्राहक न्याय मंचात विमान कंपनीच्या विरोधात दाद मागितली होती.
नाशिकच्या शरणपुर रोड येथील नलिन शहा आणि कविता शाह यांनी विमान कंपनीच्या विरोधात ग्राहक न्याय मंचात धाव घेतली होती.
शाह यांना तिरुअनंतपुरम येथे एका विवाह सोहळ्याला जायचे होते, त्यासाठी त्यांना इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या मुंबईहून निघणाऱ्या विमानाची 34 हजार 637 रुपयांची तिकिटे काढली होती.
मात्र, हेच विमान ऐनवेळी रद्द झाल्याने शाह यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुसऱ्या विमानाने विवाहस्थळी जाण्याचा प्रयत्न केला मात्र तेही उशिराने पोहचले.
एकूणच विमान सेवेच्या गोंधळामुळे शाह यांना विवाहला पोहचता आले नाही त्यामुळे त्यांनी विमान कंपनीच्या विरोधात धाव घेण्याचे ठरविले होते.
त्यानुसार न्याय मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी तक्रारदार आणि कंपनीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय दिला होता.
त्यानुसार विमान कंपनी ग्राहक सेवा देण्यास असमर्थ ठरल्याचे दिसून येत आल्याचा ठपका ठेवत अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विमान प्रवासाचे 34 हजार 627 याशिवाय शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी दोन लाख 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे.