रिक्षा लावायची असेल तर महिना दोन हजार द्यावे लागतील अन्यथा… रिक्षा माफियांची दादागिरी

| Updated on: Oct 27, 2022 | 5:20 PM

रिक्षा माफियांची खुलेआम हफ्ता वसुली सुरू असतानाही, पोलीस मात्र कडक कारवाई करत नसल्याने वाहतूक आणि आचोळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रिक्षा लावायची असेल तर महिना दोन हजार द्यावे लागतील अन्यथा... रिक्षा माफियांची दादागिरी
नालासोपाऱ्यात रिक्षा माफियांची दादागिरी
Image Credit source: tv9
Follow us on

नालासोपारा : नालासोपाऱ्यात रिक्षा माफियांची (Rikshaw Mafia) दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा लावायची असेल तर महिना दोन हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा जीवे ठार मारले जाईल, अशी धमकी (Threat) रिक्षा माफियाकडून दिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आचोळे पोलीस ठाण्यात (Aachole Police Station) तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या रिक्षा माफियावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता रिक्षाचालक करत आहेत.

भावेश चौहान उर्फ लालू, प्रभाकर सिंग चौहान, अभिषेक चौहान उर्फ मुलायम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा माफियांची नावे आहेत. हे तिघेही नालासोपारा पूर्व कॅपिटल मॉल जवळील परिसरात राहणारे आहेत. तर राहुल राकेश राय असे तक्रारदार रिक्षाचालकाचे नाव आहे.

तक्रारदार मागील आठ वर्षापासून रिक्षा चालवतो

नालासोपारा पूर्व अलकापुरी या भागात तक्रारदार हा मागील 8 वर्षांपासून रिक्षा चालवतो. याच अलकापुरी परिसरात आरोपी भावेश उर्फ लालू याच्या 15 ते 20 रिक्षा आहेत.

हे सुद्धा वाचा

दरमहा 2 हजार रुपये हफ्ता देण्याची मागणी

अलकापुरी परिसरात या रिक्षामाफियांची दादागिरी चालत असून, अलकापुरी रिक्षा थांब्यावर जर रिक्षा थांबवून धंदा करायचा असेल तर दिवसाला 50 रुपये आणि महिन्याला 2 हजार रुपये प्रत्येकी रिक्षाचालकाकडून जबरदस्तीने वसुली करतो.

हफ्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी

जर रिक्षाचा हफ्ता दिला नाही तर सर्वसामान्य रिक्षाचालकांना धमकावणे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या देतो असा आरोप तक्रारदार रिक्षाचालकाने केला आहे. याबाबत आचोळा पोलीस ठाण्यात भादवी कलम 386, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा माफियांची खुलेआम हफ्ता वसुली सुरू असतानाही, पोलीस मात्र कडक कारवाई करत नसल्याने वाहतूक आणि आचोळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.