नवी दिल्ली : Amazon च्या सीनियर मॅनेजरची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्यावेळी सीनियर मॅनेजर हरप्रीत गिल मित्रासोबत बाइकवरुन चालला होता. तितक्यात मागून स्कुटीवरुन आरोपी आले. त्यांनी बाईकला ओव्हरटेक करुन थांबायला भाग पाडलं. त्यानंतर दणादण गोळ्या झाडून हरप्रीत गिलची हत्या केली. या गोळीबारात हरप्रीत सोबत असलेला त्याचा मित्र गोविंद जखमी झाला. माहिती मिळताच, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. दिल्लीच्या भजनपुरा भागात हे हत्याकांड घडलं.
पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हरप्रीत गिल (36) ऑनलाइन शॉपिंग कंपनी Amazon मध्ये सिनीयर मॅनेजर पदावर कार्यरत होता. मंगळवारी रात्री मित्र गोविंदसोबत तो कुठून तरी येत होता. गोविंदच हंग्री बर्ड नावाच मोमोजच एक दुकान आहे. गोविंदने पोलिसांनी माहिती दिलीय. त्यानुसार, हरप्रीत आणि तो भजनपुराच्या आठ नंबरच्या गल्लीत राहतो. मंगळवारी रात्री दोघे बाईकवर होते. आठ नंबर गल्लीच्या वळणावर ते पोहोचले. त्याचवेळी स्कुटीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांना रोखलं.
काय होतय हे समजलच नाही
अचानक आरोपी समोर आल्याने, काय होतय हे समजलच नाही, असं गोविंदने सांगितलं. आरोपींनी तमचा काढून फायरिंग सुरु केली. धडाधड गोळीबार करुन ते घटनास्थळावरुन पसार झाले. गोळ्या लागल्याने आम्ही दोघे गंभीररित्या जखमी झालो होतो, असं गोविंदने सांगितलं. दोघांनी आरडाओरडा सुरु केल्यानंतर त्यांना मदत मिळाली. हरप्रीतचा जागीच मृत्यू झाला होता. गोविंदची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी त्याला विशेष देखरेखीखाली ठेवलं आहे.
त्यामागे काय कारण आहे?
स्थानिक व्यक्तीने पोलीस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा तपासणी सुरु झाली आहे. हा गोळीबार का केला? त्यामागे काय कारण आहे? हे समजू शकलेलं नाहीय. जुन्या दुश्मनीमुळे हे घडल्याच पोलिसांना संशय आहे. पोलीस सर्व अंगांनी या घटनेचा तपास करतायत.