ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मोबाईल टॉवरच्या वादातून सख्ख्या भावानेच हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सदाशिव पाटील यांचे भाऊ जनार्दन पाटील आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल टॉवरच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर त्यांच्या भावानेच हल्ला केला. त्यापूर्वी सदाशिव पाटील आणि टॉवर दुरुस्त करणाऱ्या इंजिनिअरमध्ये वाद सुरु होता. हा वाद विकोपाला जात असल्यामुळे पाटील यानी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील मध्ये पडल्यामुळे त्यांचा भाऊ जनार्दन पाटील यांनी त्यांना थेट मारहण केली. तसेच जनार्दन पाटील यांनी दुरुस्ती करणाऱ्या इंजिनिअरलाही मारहाण केली.
हा प्रकार घडल्यानंतर सदाशिव पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जनार्दन पाटील आणि त्यांचा मुलगा कल्पेश यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे माजी आमदारी बाळासाहेब मुरकुटे यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नेवासा येथील कृषीपंपांची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या आंदोलनात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीदेखील सहभाग घेतला होता. मात्र आंदोलन करुनदेखील मागण्या मान्य होत नसल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती सध्या स्थीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इतर बातम्या :
Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा
‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?