अंबरनाथ: अंबरनाथ येथे चिखलोली परिसरात चार अज्ञात दरोडेखोरांनी एका सराफा दुकानावर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने सराफा दुकानातील तिघेजण जखमी झाले. भरदुपारी झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. (ambernath: Jewellery shop robbed by 4 armed thieves)
अंबरनाथ पश्चिमेला चिखलोली येथे हे सर्वोदय नगर आहे. अंबरनाथ-बदलापूरच्या सीमेवरच हे सर्वोदय नगर आहे. हा परिसर अत्यंत शांत असून या भागात वर्दळ कमी असते. दुपारीही या भागात वर्दळ नसते. त्याचा फायदा घेऊनच या दरोडेखोरांनी सर्वोदय नगर परिसरातील भवानी ज्वेलर्सवर दरोडा टाकला. दुपारी 2 वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी या ज्वेलर्स जवळ येऊन गोळीबार केला. त्यामुळे दुकानातील तीन कामगार जखमी झाले. त्यानंतर या दरोडेखोरांनी दुकानातील दागिने घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली आहे. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे. दरोडेखोरांनी दागिने पळवून नेले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, दागिने पळवून नेले असतील तर किती दागिने पळवून नेले, त्याची किंमत काय होती? दागिन्यासह रोख रकमही पळवून नेली का? आदी बाबींचाही तपास करण्यात येत आहे. मात्र, भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात पोलीस सुरक्षा देण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
थरार सीसीटीव्हीत कैद
दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात दुकान मालक लक्ष्मण सिंह दसाना यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरेडेखोरांनी 7 राउंड फायरिंग केली. यात 3 लोक गंभीर जखमी झाले आहेत. दुकानातील कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून दरोडेखोरांशी दोन हात केले. या झटापटीत तीन कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले. यावेळी त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (ambernath: Jewellery shop robbed by 4 armed thieves)
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7:30 PM | 9 January 2021https://t.co/Noxg0zt4Ru
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2021
संबंधित बातम्या:
नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या
24 तासांत 3 हत्या! उपराजधानी हादरली, गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगार बेलगाम
पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना
(ambernath: Jewellery shop robbed by 4 armed thieves)