औरंगाबाद : अटक तसेच गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे औरंगाबादेत एक अजब प्रकार घडला आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांनी थेट गटारात लोळण घेतली आहे. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या समोर आला असून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा प्रकार शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याअंतर्गत घडला आहे. (gamblers jump into gutter in Aurangabad to evade arrest)
मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही लोक जुगार खेळत होते. पोलिसांना आपल्या गुप्तहेरांच्या मदतीने या प्रकाराची माहिती समजली. हा प्रकार समजताच पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांनी थेट गटाराचा सहारा घेतला. त्यांनी थेट गटारात लोळण घेतली.
पोलीस घटनास्थळी पोहोचताच आता आपल्याला अटक होणार असल्याचा सुगावा आरोपींना लागला. त्यांनी लगेच अटक तसेच गुन्हा दाखल न होण्यासाठी पुढचे पाऊल टाकायला सुरुवात केली. पोलिसांची नजर बाजूच्या गटाराकडे जाणार नाही असा अंदाज बांधत या आरोपींनी थेट गटारात लोळण घेतली. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी या आरोपींनी थेट गटाराचा सहारा घेतला.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, आरोपींनी गटारमध्ये लोळण घेतल्यामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेणे काही काळासाठी कठीण होऊन बसले होते. पोलीस नालीच्या काठावर आरोपींचा शोध घेत होते. तर आरोपी हे गटारात लोटांगण घेत होते. शेवटी शोधाशोध करुन पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या :
25 सेकंदांचा थरार, 18 वर्षांचा तरुण चेंबरमध्ये पडला, पुढे काय घडलं ?
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी, औरंगाबादेत बाजारपेठांच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
मोठी बातमी! राज्य सरकार एसटीला देणार 600 कोटी; कामगारांना रखडलेला पगार मिळणार!https://t.co/OYQCrwVsJR#anilparab | #msrtc | #msrtcofficial | #mahavikasaghadi | #AjitPawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2021
(gamblers jump into gutter in Aurangabad to evade arrest)