सौभाग्याचं लेणंही सुरक्षित नाही, चोरीचा जुना पॅटर्न पुन्हा चर्चेत, नाशिकमध्ये काय घडलं ?

| Updated on: Mar 10, 2023 | 2:03 PM

नाशिक शहर पोलिसांसमोर नवं आव्हान निर्माण झाले आहे. चोरीचा पॅटर्न जरी जुना असला तरी नाशिक शहरातील महिलांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे.

सौभाग्याचं लेणंही सुरक्षित नाही, चोरीचा जुना पॅटर्न पुन्हा चर्चेत, नाशिकमध्ये काय घडलं ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक मध्ये एका चोरीची जोरदार चर्चा होऊ लागलेली आहे. खरंतर नाशिक मध्ये सोनसाखळी ( Nashik Chain Snaching ) चोरीची घटना नवीन नाही. नुकतीच म्हसरूळ येथील एक सोन साखळी चोरीची घटना ( Crime News ) समोर आली आहे. मात्र, या घटनेनंतर चोरीचा जुनाच पॅटर्न समोर आल्याने आता महिला वर्गासमोरील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या सत्रात महिला या बाहेर पडत असतात, कुणी कचरा टाकण्यासाठी तर कोणी अंगण झाडण्यासाठी. याच वेळेत काही चोरटे दुचाकीवरून येतात आणि महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं ओरबाडून नेतात.

दुचाकीवरून आलेले चोर काही क्षणात पसार होत असल्याने नाशिक शहर पोलिसांसमोर चोरट्यांना रोखण्याचे नवं आव्हान निर्माण झाले आहे. म्हसरूळ येथील घटनेत महिलेने जोरात आरडा ओरड केल्याने मंगळसूत्राचा अर्धाच भाग चोरट्यांच्या हाती लागला आहे.

नाशिक शहरात काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, उन्हाळा सुरू होताच सोनसाखळी चोरांनी डोकं वर काढलं असून महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणं सुरक्षित नसल्याची भावना पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

म्हसरूळ येथील हेमलता सुभाष बधान या सकाळी कचरा टाकण्यासाठी जात असतांना हा प्रकार घडला आहे. महिलेने जोरजोरात आरडा ओरड सुरू केल्याने अर्धाच भाग चोरट्यांच्या हाती लागला आणि त्यांनी तेथून पळ काढला.

नाशिक शहरातील गेल्या काही महिन्यानंतर सोनसाखळी चोरीची घटना समोर आल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सोन साखळी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त लावावा अशी मागणी होऊ लागली आहे.