नवी दिल्ली : उपहार थिएटर आग प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने अंसल बंधू सुशील आणि गोपाळ यांना दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वर्ष 1997 मध्ये दिल्लीतील उपहार थिएटरमध्ये आग लागली होती. या आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला होता. पटियाला हाऊस कोर्टाने दोघा अंसल बंधूंना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दोघांनाही एक महिन्यापूर्वी उपहार आग प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. आज ही शिक्षा जाहीर करण्यात आली.
याआधी अंसल बंधूंना सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांना 30-30 कोटी रुपयांच्या दंडावर सोडण्यात आले, ज्याचा वापर देशाच्या राजधानीत ट्रॉमा सेंटर बांधण्यासाठी केला जाईल. उपहार आगीच्या घटनेतील अन्य दोन आरोपी हर स्वरूप पनवार आणि धरमवीर मल्होत्रा यांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. युद्धावर आधारित चित्रपट ‘बॉर्डर’च्या प्रदर्शनादरम्यान उपहार थिएटरमध्ये आग लागली. चित्रपटगृहात अग्निसुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे गुदमरून 59 जणांना जीव गमवावा लागला, तर चेंगराचेंगरीमुळे 100 हून अधिक जण जखमी झाले.
न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेश चंद शर्मा आणि अन्य दोन आरोपी पीपी बत्रा आणि अनूप सिंग यांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाने 8 ऑक्टोबर रोजी रिअल इस्टेट व्यावसायिक अन्सल बंधू, न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेश चंद शर्मा आणि पीपी बत्रा आणि अनूप सिंग यांना या प्रकरणात दोषी ठरवले होते. अन्य दोन आरोपी हरस्वरूप पनवार आणि धरमवीर मल्होत्रा यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता. एव्हीयूटीच्या अध्यक्षा नीलम कृष्णमूर्ती यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते, ज्याच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण आगीच्या घटनेत पुराव्याशी छेडछाड करण्याशी संबंधित आहे ज्यात अंसल बंधूंना दोषी ठरवले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
1997 मध्ये बॉर्डर चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी लागलेल्या भीषण आगीत एकूण 28 कुटुंबानी आपल्या प्रियजनांना गमावले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. 15 नोव्हेंबर 1997 रोजी सीबीआयने एकूण 16 जणांवर आरोपपत्र दाखल केले. त्यात उपहारचे मालक गोपाल अन्सल आणि सुशील अन्सल यांचाही समावेश होता.
20 नोव्हेंबर 2007 रोजी प्रदीर्घ सुनावणीनंतर पटियाला हाऊस कोर्टाने 12 आरोपींना शिक्षा सुनावली. अंसल बंधूंना निष्काळजीपणा आणि इतर कलमांद्वारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अन्सल बंधूंचा जामीन रद्द करण्यात आला. उच्च न्यायालयाने 6 आरोपींना शिक्षा सुनावली आणि अन्सल बंधूंची शिक्षा 2 वर्षांवरून 1 वर्ष केली. यादरम्यान अन्सल बंधूंना तुरुंगात पाठवण्यात आले. (Ansal brothers sentenced to seven years for tampering with evidence in uphar theatre fire case)
इतर बातम्या
गर्लफ्रेण्डशी झालेली मैत्री खटकली, दारु प्यायला बोलावून मित्राचाच काटा काढला
आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावा, 25 हजार कमवा, पुण्यातील 300 कारमालकांची कशी झाली फसवणूक?