नांदेड : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यास पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केले. या झटापटीत अभियंत्याचे दोन दात पडले आणि नाकाला चावा घेतला. नांदेडमधील वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्रीकांत सोनटक्के वीज बिल वसुलीसाठी स्नेह नगर पोलीस वसाहतीत गेले होते. एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या मीटरमधून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पोलीस कर्मचाऱ्याकडे विचारना करण्यासाठी सोनटक्के गेले असता पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रे याने सोनटक्के यांना नाकावर ठोसा मारला. यात सोनटक्के यांचे दोन दात पडले. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी चांगलेच धास्तावले. विचारना करताना आता सांभाळून करावं लागेल. कोणता ग्राहक कोणत्या परिस्थितीत असेल काही सांगता येत नाही.
पोलीस कर्मचाऱ्याने सोनटक्के यांच्या नाकावरही चावा घेतला. सोनटक्के यांच्यासोबत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून कसेबसे सोनटक्के यांची सुटका केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा कौटुंबीक वाद सुरू आहे. त्यांची पत्नी सोडून गेल्याने ते मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात आले.
वीज अभियंता विचारना करण्यासाठी गेला होता. तो पोलीस वसाहतीत. पोलीस वसातहीत अभियंत्याने पोलिसास विचारना केली. याचा त्यांना राग आला. या रागात त्यांनी ठोसा अभियंत्यास मारला. यात अभियंत्याचे दोन दात पडले. त्यानंतरही पोलिसाचा राग काही कमी झाला नाही. त्यामुळे त्याने अभियंत्याचा चावा घेतला. या सर्व घटनेत कंत्राटी कर्माचारी धाऊन गेले. त्यांनी दोघांनाही बाजूला केला. पोलीस कर्मचारी हा मानसिक तणावात असल्याचे सांगितलं जातं. या भरात त्याने हा हल्ला केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. आता हे प्रकरण पोलिसांत पोहचले आहे. त्यामुळे एका सरकारी कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात, याकडं लक्ष लागलं आहे.