एक धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलीस गुन्हा घडल्या त्या ठिकाणी म्हणजे क्राइम स्पॉटवर घेऊन जात होते. हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. त्यावेळी आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला व त्याने शेजारच्या तलावात उडी मारली. यामध्ये मुख्य आरोपी तफ्फजुल इस्लामचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्याला सकाळी 4 वाजता क्राइन सीनवर नेत असताना त्याने तलावात उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. आसामच्या नगांव ढिंग गँगरेप प्रकरणात तफ्फजुल इस्लाम मुख्य आरोपी होता.
दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर आरोपीचा मृतदेह सापडल्याच पोलिसांनी सांगितलं. गुरुवारी संध्याकाळी तीन आरोपींनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी ट्यूशनवरुन परत येत असताना तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीला त्याच अवस्थेत सोडून आरोपी तिथून पसार झाले. पीडित मुलगी रस्त्याला कडेला बेशुद्धावस्थेत पडली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
स्थानिकांमध्ये प्रचंड संताप
पीडित मुलीची प्रकृती गंभीर होती. तिला नगांव मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेविरोधात संपूर्ण राज्यात जोरदार विरोध प्रदर्शन झालं. स्थानिक लोकांनी या घटनेविरोधात प्रदर्शन केलं. विविध संघटना आणि स्थानिकांनी आरोपींना अटक होईपर्यंत अनिश्चित काळासाठी बंदची मागणी केली होती.
‘आमच्या अंतरात्म्याला दु:ख झालय’
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ‘अल्पवयीन मुलीसोबत घडलेली ही घटना मानवतेविरुद्ध गुन्हा आहे’ असं टि्वट त्यांनी केलय. “या घटनेमुळे आमच्या अंतरात्म्याला दु:ख झालय. आम्ही कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगारांना शासन करु. मी आसाम पोलिसांच्या डीजीपींना घटनास्थळाचा दौरा करुन अशा राक्षसांविरोधात त्वरित कारवाई कण्याचे आदेश दिले आहेत” असं हिमंता बिस्वा सरमा यांनी टि्वटमध्ये म्हटलय.
पीडित मुलीची प्रकृती कशी आहे?
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री पीयूष हजारिका यांनी पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा असल्याच सांगितलं आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर मंत्री पीयूष हजारिका यांनी ढिंगचा दौरा केला व पीडितेच्या आरोग्याविषयी माहिती घेतली.