प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येताच सर्वत्र खळबळ माजली आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या निधनानंतर त्यांच्या हत्येचा गुन्हा कोण नोंदवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. दोघांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचं नाव समोर असून, ती व्यक्ती अतिक अहमद आणि अशरफ यांच्या निधनानंतर त्यांच्या हत्येचा गुन्हा पोलिसांत नोंदवणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफ याची पत्नी झैनब फातिमा हिच्या वतीने दोघांच्या हत्येची तक्रार दिली जाऊ शकते. सध्या या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
झैनब फातिमा ही पती अशरफ आणि दीर अतीक अहमद याच्या हत्येनंतर पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अतीकचे वकील एफआरआय संबंधी झैनब हिच्यासोबत शाबगंज पोलीस स्थानकात जाणार आहेत. या धक्कादायक घटनेसंबंधीत एफआरआय प्रथम प्रयागराज पोलीस स्थानकात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी अहमद आणि अशरफ यांचं शवविच्छेदन होणार आहे. विशेष म्हणजे अतिक मीडियाला बाईट देत असतानाच गोळीबार करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोर प्रयागराज येथील राहणारे नसून, बाहेरील आहेत. पोलिसांना घटनास्थळावरुन तीन बंदुका, काडतुसं, कॅमेरा आणि ओळखपत्रे सापडली आहेत. घटनास्थळावरुन मिळालेल्या वस्तूंची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. तिघांकडे असलेला कॅमेरा कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक अहमद आणि अशरफ याची हत्या करणारा लवलेश तिवारी बांदा येथे राहणारा आहे. दुसरा आरोपी अरुण मौर्य हमीरपूर येथील रहिवासी आहे. तर तिसरा आरोपी सनी कासगंज जिले येथील राहणारा आहे. अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. आतिकचा भाऊ अशरफ आणि इंटरनॅशनल डॉन अबू सालेम यांचे चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.