मुंबई: मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुकीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा या हत्येत हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हिरेन हत्येप्रकरणात पहिल्यांदाच अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ATS arrested two person in mansukh hiren suicide case)
मनसुख हिरेनप्रकरण कालच एनआयएकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर आज एटीएसने या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचा हिरेन मृत्यूप्रकरणात हात असल्याचं बोललं जात आहे. आता या दोघांचा ताबा एनआयएकडे देण्यात येणार आहे. एटीएसने नरेश धारे आणि विनायक शिंदे या दोघांना अटक केली आहे. धारे हा बुकी असून शिंदे हे पोलीस दलात होते. मात्र त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. या दोन जणांना अटक केल्यानंतर हिरेन प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
25 जणांचे जबाब नोंदवले
हिरेनप्रकरणी एटीएसने आतापर्यंत 25 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून बरेच धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोण आहेत मनसुख हिरेन?
मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून रहात आहेत.
अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली होती. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. (ATS arrested two person in mansukh hiren suicide case)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/TqmVf0mJJi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये?, मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार; देशमुख दिल्लीला जाणार की नाही?
मुंबई पोलिसांना 100 कोटींचं टार्गेट तर महापालिकेचा आकडा किती असेल; मनसेचा सवाल
(ATS arrested two person in mansukh hiren suicide case)