औरंगाबाद: कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये कोणतेही स्टेटमेंट करताना अत्यंत खबरदारीपूर्वक करावं लागतं. किंबहुना जे सत्य आहे, तेच स्पष्टपणे, निर्भयपणे बोलणं अपेक्षित आहे. मात्र असं असतानाही अनेकदा साक्षीदार दबावापायी किंवा अमिषापायी आपली साक्ष फिरवतात. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने ( Auranagabad District Sessions Court) एका हत्या प्रकरणात, फितूर झालेल्या साक्षीदारांवरच खटला भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल समजला जात आहे.
औरंगाबाद सत्र न्यायालयाने एका खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याची अधिक माहिती अशी की, मयत महंमद हुसेन खान उर्फ आसेफ (30, रा. रोजाबाग, हर्सुल) वडिलांसह रोजाबाग परिसरातील मौलाना आझाद कॉलेज समोर आदर्श नावाचे हॉटेल चालवत होता. आरोपी व मयत हे दोघे मित्र होते. 6 एप्रिल 2013 रोजी मयत वडील युसूफ खानसोबत हॉटेलवर होते. रात्री आरोपी तिथे आला. तर वडील घरी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे साक्षीदार गुल्शनबी आणि तिचा मुलगा जाकेर यांनी ‘आरोपीने मयताला मारहाण केली असून त्याला एम्स रुग्णालयात उपचारासाठी भरती केल्याची’ माहिती फोनवरुन दिली. आरोपीविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन अंमलदार गणेश रामलाल बाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
गुल्शनबी आणि तिचा मुलगा जाकेर या दोघांचा जबाब पोलीसांनी आणि विशेष न्यायदंडाधिकारी यांनी नोंदवला होता. तरीही न्यायालयात साक्ष देतांना ते फितूर झाले. शपथेवर हेतु परस्पर खोटी साक्ष दिली म्हणून सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी दोघांवर कारवाई करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोघांवर खोटी साक्ष दिल्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचे आदेश निबंधकांना दिले.
मित्राच्या डोक्यात फरशीचे घाव घालत त्याचा निर्घृण खून करणाऱ्या फजल सिंकदर पटेल याला भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 6 महिने साध्या कैदेची शिक्षा आरोपीला भोगावी लागेल. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. पारगांवकर यांनी ही शिक्षा सुनावली.
तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. आर. तेलुरे आणि श्रीपाद परोपकारी यांनी तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी गुन्हा घडल्यापासून कारागृहात होता. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक लोकाभियोक्ता बी. आर. लोया यांनी 18 साक्षीदारांचा जबाब नोंदवले. त्यापैकी 5 प्रत्यक्ष साक्षीदार होते, परंतु चार साक्षीदार फितूर झाले तर अतेशाम नजीमोद्दीन याची साक्ष महत्वाची महत्वाची ठरली.
इतर बातम्या-
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशासाठी हवा होता, ओबीसी आरक्षणावरून केदार यांचं मोठं