Baba Siddique Shot Dead in Mumbai: सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या झाली. ही हत्या लाँरेस बिश्नोई गँगने केली. बाबा सिद्दिकीची हत्या करणारा एक आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशातील बहराइच येथील शिवा उर्फ शिवकुमार गौतम आहे. तो केवळ 18-19 वर्षांचा आहे. त्याची आई म्हणाले, शिवा स्क्रॅपयार्डमध्ये काम करण्यासाठी पुण्यात गेला होता. परंतु तो मुंबईत कसा गेला? हे मला माहीत नाही, असे शिवाच्या आईने म्हटले.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवाची आईने एएनआयला सांगितले की, शिवा होळीला घरी आला होता. त्यानंतर तो आला नाही. तो फोनवरसुद्धा माझ्याशी बोलत नव्हता. या घटनेबद्दल मला काहीच माहीत नाही. तो पुण्यात काम करत असल्याचे मला माहीत होते. मुंबईत का आला? काय करत होता? या गोष्टींची आम्हाला कल्पना नाही. तो आमच्याशी काहीच बोलला नाही. त्यामुळे ही घटना कशी घडली हे आपण सांगू शकत नाही. तो गावात राहत असताना विटा उचलण्याचे काम करत होता. बाहेर गेलो तर तीन वर्षांत चांगली कमाई करू, असे तो म्हणत होता. मुलगी आजारी असताना त्याने तीन हजार रुपये पाठवले होते, त्यानंतर त्याने पैसे सुद्धा पाठवले नाही.
मुंबई पोलिसांनी घटनेच्या रात्रीच तीन आरोपींपैकी दोघांना पकडले होते. यामधील तिसरा आरोपी शिवा अद्याप फरार आहे. शिवा 5-6 वर्षांपासून पुण्यात काम करत होता. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत या टोळीने ही जबादारी स्वीकारली. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांचा खून सुपारी देऊन घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
#WATCH | Bahraich, UP | Baba Siddique murder case | Absconding accused Shiva's mother says, "He went to Pune to work in a scrapyard. I knew only this. I was not aware of what he was doing in Mumbai…He came home in Holi. After that, he did not come. He was not talking to me even… pic.twitter.com/RpdoPqDwNf
— ANI (@ANI) October 13, 2024
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे सत्ताधारी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ही फक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नसून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे.