मैत्रिणीनेच केला घात, दारु पाजून केले मित्राच्या हवाली, नराधामाकडून १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार

| Updated on: Dec 27, 2024 | 7:11 PM

Thane Crime News: पीडित तरुणीने याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या.

मैत्रिणीनेच केला घात, दारु पाजून केले मित्राच्या हवाली, नराधामाकडून १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार
क्राईम न्यूज
Image Credit source: social media
Follow us on

Thane Crime News: बदलापूरात चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. आता बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचार प्रकरण घडले आहे. या प्रकरणात मैत्रिणीनेच मैत्रिणीचा घात केल्याचे दिसून येत आहे. बदलापूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली. त्यानंतरत तिची शुद्ध हरपल्यानंतर तिला रिक्षाचालक मित्र दत्ता जाधव याच्याकडे सोपवले. त्या नाराधामाने पीडितेवर अत्याचार केला.

अशी घडली घटना

पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी आहे. ती २१ डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतले. त्यानंतर या तिघांनी मद्यपान केला. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्ध हरपली. तिचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या लक्षात हा प्रकार आला.

पोलिसांकडून आरोपींना अटक

पीडित तरुणीने याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.