डोंबिवली (ठाणे) : राज्यावर कोरोनाचं संकट सुरु आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना खरंच अद्यापही याबाबत गांभीर्य दिसत नाही. डोंबिवलीत सर्व नियमांना धुडकावून बैल गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे बैल गाडी शर्यतीला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीदेखील ही शर्यत आयोजित करण्यात आली. तसेच लॉकडाऊनचे सर्व नियम धुडकावून हजारो नागरिक या ठिकाणी एकत्र आले. या प्रकरणी अखेर 70 जणांविरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापूढे डोंबिवलीत बैलांची शर्यत कोणी आयोजित करु नये यासाठी पोलिसांनी सक्त कारवाईचे पाऊल उचलले आहे (Bailgada sharyat organize in Dombivali).
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीनजीक आंतर्ली गावात आज सकाळी बैल गाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणात या शर्यतीत भाग घेण्यासाठी आणि हजारो लोक शर्यत बघण्यासाठी जमले होते. तब्बल चार तास ही शर्यत सुरु होती. बैल गाडीच्या शर्यतीवर न्यायालयाची बंदी घातली आहे. शिवाय लॉकडाऊन सुरु असल्याने विनाकारण नागरीक घराबाहेर फिरू शकत नाहीत. पण याठिकाणी तर हजारो लोक जमा झाले होते. विशेष म्हणजे पोलिसांना याची कानोकान खबर नव्हती. ही एक आश्चर्याची बाब होती (Bailgada sharyat organize in Dombivali).
‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीनंतर कारवाई
या घटनेबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने बातमी प्रदर्शित केली. या बातमीची कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी ही शर्यत आयोजित करणारे आणि शर्यतीत सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाईचे आदेश मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरु केली.
जल्लोष साजरा करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल
याच दरम्यान बैलाच्या शर्यतीची आणि शर्यत जिंकल्यानंतरचा जल्लोष साजरा करतानाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. अखेर या प्रकरणी आयोजक संतोष भंडारी, विश्वनाथ काळण, समीर भोईर, साईनाथ सोरखादे, शिरीष भोईर, अरुण, दिपक पाटील, सुभाष पाटील, मोतीराम भद्रीके, रतन म्हात्रे, शंकर पाटील,साईराज पाटील, उत्तम गवळी, अजय पाटील, प्रदिप गीते आणि राहुल पाटील यांच्यासह अन्य 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांची पूढील कारवाई सुरु केली आहे.
हेही वाचा : मोठ्या जल्लोषात लग्न केलं, महिन्याभरात 15 लाखांचे दागिने घेऊन नवरी बॉयफ्रेंडसोबत फरार, सीसीटीव्हीत घटना कैद