मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोईच नाव समोर आलय. लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित अनेक किस्से समोर आलेत. जेलमध्ये बसून तो कशा मोठमोठ्या हत्या घडवत आहे, त्याने सगळेच हैराण आहेत. बिश्नोईच पुढच टार्गेट कोण? यावरुनही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण अशा सुद्धा अनेक गॅग्स आहेत, ज्यांच्यासाठी लॉरेन्स बिश्नोई दुश्मन नंबर 1 आहे.
लॉरेन्स बंबीहा गँगसाठी लॉरेन्स दुश्मन नंबर 1
लॉरेन्स बिश्नोई आणि बंबीहा गँगच्या दुश्मनीची चर्चा सामान्य आहे. बंबीहा गँगचे अनेक सदस्य लॉरेन्स बिश्नोईला दुश्मन नंबर 1 मानतात. बंबीहा गँगच नेतृत्व सुखप्रीत सिंह बुड्ढाकडे आहे. लॉरेन्स आपला सहकारी अमित शरणच्या हत्येसाठी सुखप्रीतला जबाबदार मानतो.
लकी पटियालला धडा शिकवण्याची लॉरेन्सची शपथ
लकी पटियाल आणि लॉरेन्सची दुश्मनी कोणापासून लपून राहिलेली नाही. दोघेही परस्पराविरुद्ध बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. लॉरेन्स लकी पटियालाला मिड्डूखेडाच्या हत्येसाठी जबाबदार मानतो. रिपोर्ट्सनुसार, लकी पटियालला धडा शिकवणार असं लॉरेन्स चौकशीत म्हणाला होता.
कौशल चौधरीची लॉरेन्सला धमकी
कौशल चौधरीसोबतही लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी आहे. मिड्डूखेडाच्या हत्येत सहभागी असलेल्या मारेकऱ्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा कौशलनेच केला असं लॉरन्सच म्हणणं आहे. कौशल चौधरीला सोडायचं नाही, हे लॉरेन्सने ठरवलं आहे. मुसेवाला हत्याकांडानंतर कौशलने लॉरेन्सला धमकी दिलेली. लॉरेन्सला सोडणार नाही, असं कौशल म्हणालेला.
नीरज बवानाने घेतलीय लॉरेन्सच्या हत्येची शपथ
नीरज बवाना सुद्धा बंबीहा गँगशी संबंधित आहे. त्यांची सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँग बरोबर दुश्मनी आहे. नीरज बवाना (दिल्ली), कौशल चौधरी (गुरुग्राम), सुनील उर्फ टिल्लू ताजपुरिया (आउटर दिल्ली) गँग बंबीहा ग्रुपचे मित्र आहेत. बंबीहा गँग मुसेवालाच्या संपर्कात होती. म्हणून बिश्नोई गँगने सिद्धूची हत्या केली. मुसेवालाच्या हत्येनंतर नीरज बवानाने सुद्धा लॉरेन्सच्या हत्येची शपथ घेतली आहे.
चौकशीनंतर जग्गू भगवानपुरिया बरोबर संबंध बिघडले
जग्गू भगवानपुरिया 2015 पासून तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर तस्करीसह अनेक आरोप आहेत. मुसेवाला हत्याकांडात जग्गूचा नाव समोर आलेलं. पोलिसांनी त्याची चौकशी सुद्धा केलेली. चौकशीत जग्गूने गोल्डी बराड आणि लॉरेन्सशी संबंधित काही माहिती दिली होती. त्यानंतर लॉरेन्स आणि जग्गूचे संबंध बिघडले.