Bandstand murder case : वांद्रे बँडस्टँड येथे एका MBBS विद्यार्थिनीची हत्या झाली होती. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 09 ने आरोपपत्र दाखल केलय. या प्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंहने विद्यार्थिनीकडे सेक्सची मागणी केली होती. मृत तरुणीने वांद्र बँडस्टॅड येथे काहीवेळ आरोपी मिथ्थू सिंहसोबत घालवला. त्यांच्यात मैत्री झाली. मिथ्थू सिंह तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. पण तिने नकार देताच मिथ्थू सिंहने तिला खडकांवर ढकललं.
ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी आरोपीने मृतदेह समुद्रात फेकला. गुन्हे शाखेने 1750 पानांच आरोपपत्र दाखल केलय. यात 100 साक्षीदारांच्या जबानी आहेत. यात चार साक्ष खूप महत्वाच्या आहेत.
मुलीच अपहरण झालं नव्हतं
हे सर्व प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर टिकून आहे. कारण पोलिसांनी बरेच प्रयत्न करुनही मृतदेह सापडला नाही. कलम 106 अंतर्गत शेवटच कधी पाहण्यात आलं, ती थिअरी येथे लावण्यात आलीय. मुलीच अपहरण झालं नव्हतं. त्यामुळे गुन्हे शाखेने अपहरणासाठी लागू होणारं, कलम 364 काढून टाकलय.
बँडस्टँड येथे ओळख झाली
मुलगी स्वत:च बँडस्टँड येथे गेली होती. तिनेच तिचा फोन स्विच ऑफ केला. तिथे तिची आरोपी बरोबर ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. दोघांनी एकत्र सेल्फी घेतले. मिथ्थू सिंह आणि त्याचा बालपणीचा मित्र अब्दुल जब्बार अन्सारी या दोघांवर आयपीसी कलम 302 आणि 201 अंतर्गत हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
का विश्वास ठेवला?
मिथ्थू सिंह अन्न-पदार्थांचा स्टॉल लावायचा. तिथेच खडकावर तिने जेवण घेतलं. दोघे परस्परांशी बोलले. सिंह तिच्यासोबत गेला व काहीवेळ तिच्यासोबत बसला. मुलगी याआधी बँडस्टँडला आली होती. त्यावेळी दोघांची ओळख झालेली. त्याच विश्वासाच्या भावनेतून तिने मिथ्थू सिंहवर विश्वास ठेवला असं पोलिसाांनी सांगितलं.
मुलीने आरोपीच्या दाढीला हात लावला
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, सेल्फी घेतल्यानंतर मुलीने आरोपीच्या दाढीला हात लावला आणि गाल ओढले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण तिने नकार दिला. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं.
पुन्हा आला, तेव्हा श्वास सुरु होता
त्याच रागातून आरोपीने तिला ढकललं. ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. आरोपी तिथून पळून गेला. मिथ्थू सिंह पुन्हा तिथे आला, त्यावेळी तिचा श्वास सुरु होता. ती बेशुद्ध होती. त्यानंतर आरोपीने तिला उचललं व समुद्रात नेऊन टाकलं असं अधिकाऱ्याने सांगितलं.