आईचा ब्लॅक फंगसने मृत्यू, आठवणींनी व्याकूळ चार लेकरांची पित्यासह आत्महत्या

| Updated on: Oct 24, 2021 | 2:29 PM

काळ्या बुरशीच्या आजाराने जून महिन्यात गोपाळची पत्नी जया हिचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. आईविना जगण्यात रस नसल्याच्या भावना पोरं सारखी व्यक्त करायची, असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.

आईचा ब्लॅक फंगसने मृत्यू, आठवणींनी व्याकूळ चार लेकरांची पित्यासह आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

बेळगाव : बेळगावी जिल्ह्यातील बोरागल गावात राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने शनिवारी आपल्या चार मुलांसह त्यांच्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीचा ब्लॅक फंगसने मृत्यू झाल्यानंतर पती व्यथित झाला होता. त्यानंतर तीन अल्पवयीनांचा समावेश असलेल्या चार लेकरांसह त्याने सामूहिक आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण?

पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जणांचा विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाने एकत्रित आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.

जून महिन्यात गोपाळची पत्नी जया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काळ्या बुरशीच्या आजाराने त्यांना ग्रासले जून महिन्यात जया हदिमनी यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

आत्महत्येचं कारण काय?

गोपाळ हदिमनी (वय 46 वर्ष), त्यांची मोठी मुलगी सौम्या (19 वर्ष) आणि 8 ते 16 वर्ष वयोगटातील तीन लहान भावंडं अशा एकूण पाच जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. आईविना जगण्यात रस नसल्याच्या भावना पोरं सारखी व्यक्त करायची, असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.

घरात पाच जणांचे मृतदेह 

हदिमनी कुटुंबीयांनी शनिवारी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला होता. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दार तोडलं, तेव्हा घरात पाचही जणांचे मृतदेह पडलेले आढळले. गोपाळ हदिमनी हे निवृत्त सैनिक असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?

आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी, बापाकडून मानेवर कोयत्याने वार, बारामतीत तरुणाचा मृत्यू

जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास