धक्कादायक! कस्टम ऑफिसर असल्याच सांगून महिला वकिलाला कपडे काढायला लावले, आणि मग….

| Updated on: Apr 10, 2024 | 10:28 AM

फसवणुकीच एक धक्कादायक प्रकरण समोर आलय. अशीलाला कोर्टात न्याय मिळवून देणाऱ्या महिला वकिलासोबत हे घडलय. महिलेला फोन आला, त्यानंतर जे घडलं, ते खूप गंभीर आहे.

धक्कादायक! कस्टम ऑफिसर असल्याच सांगून महिला वकिलाला कपडे काढायला लावले, आणि मग....
crime news
Follow us on

महिला वकिलाची घोटाळेबाजांनी फसवणूक केल्याच धक्कादायक प्रकरण समोर आलय. या महिलेची तब्बल 10 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी महिला वकिलाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. महिला पेशाने वकील आहे. महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलला काही जणांनी तिच्याशी संपर्क साधला. मुंबईच्या कस्टम विभागातील अधिकारी असल्याच फोन करणाऱ्यांनी सांगितलं. सदर महिला बंगळुरुला राहते.

सिंगापूरहून तुमच्या नावाने ड्रग्जच पाकिट आलय, असं घोटाळेबाजांनी महिलेला सांगितलं. नार्कोटिक्स टेस्टसाठी महिलेला व्हिडिओ कॉलवर कपडे काढायला सांगितले, असं महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय. असं दोन दिवस चाललं. नंतर घोटाळेबाजांनी महिला वकिलाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. खात्यात 10 लाख रुपये ट्रान्सफर केले नाही, तर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊ लागले.

घाबरलेल्या महिलेने काय केलं?

घाबरलेल्या महिलेने सांगितलेली रक्कम खात्यात जमा केली. 7 एप्रिलला तिने या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आयटी कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. खंडणी आणि फसवणूक या आयपीसीच्या कलमांखाली सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आलाय.