अर्ध्यारात्री वहिनीने दीराला घरी बोलावलं, त्याला प्रेमाने खोलीत नेलं आणि असं धक्कादायक वागली की….

| Updated on: Aug 31, 2024 | 11:48 AM

या घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. ऐकणारा प्रत्येकजण हैराण आहे. गावातील लोकांमध्ये या बद्दल विविध चर्चा सुरु आहेत.

अर्ध्यारात्री वहिनीने दीराला घरी बोलावलं, त्याला प्रेमाने खोलीत नेलं आणि असं धक्कादायक वागली की....
love
Follow us on

वहिनी आणि दीरामध्ये मैत्रीच नातं असतं. पण काहीवेळा दोघांना या नात्याचा विसर पडतो. त्यातून नको ते घडतं. अशाच एका प्रकरणात वहिनीने तिच्या दीराला प्रेमाने अर्ध्या रात्री घरी बोलावलं. दीर आल्यानंतर वहिनी त्याला खोलीत घेऊन गेली. त्यानंतर जे घडलं, त्याची कोणीच कल्पना केली नव्हती. वहिनीने दीराचा प्रायवेट पार्ट कापला. पोलिसांनी दीराच्या तक्रारीवरुन वहिनी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी दीराला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. या बद्दल ऐकणारा प्रत्येकजण हैराण आहे. पोलिसांनी जखमी दीराची चौकशी केली. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असा दीराचा दावा आहे. सीधी जिल्ह्यातील वनांचल कुसमी भागातील ही घटना आहे. एका महिलेने जमिनीच्या वादातून दीराला जखमी केलं.

तो खोलीत गेल्यानंतर….

गावातील लोकांमध्ये या बद्दल विविध चर्चा सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी वहिनी विरोधात कारवाई केली आहे. घरात जमिनीवरुन वाद आहेत. रात्री वहिनीने मला प्रेमाने घरी बोलावलं. तो खोलीत गेल्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा प्रायवेट पार्ट कापला. या हल्ल्यानंतर तो वेदनेने विव्हळत होता. कुटुंबियांना या बद्दल समजल्यानंतर ते जखमी दीराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात घेऊन गेले.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. युवकाच्या तक्रारीवरुन वहिनी विरोधात गुन्हा नोंदवल्याच सीधीच्या एसएसपीने सांगितलं. वहिनीने प्रायवेट पार्टवर हल्ला केल्याचा आरोप युवकाने केला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. आरोपी महिलेविरोधात कारवाई सुरु आहे.