कोचिंग टीचर बिट्टू कुमार हत्याकांडात पोलिसांनी युवकाचा जवळचा मित्र सुमित कुमारला अटक केली आहे. दोघांमध्ये समलैंगिक संबंध असल्याच गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. 3 वर्षांपासून दोघांमध्ये कौटुंबिक आणि निकट मैत्री होती. पोलिसांना सुमितच्या भावाच्या घरात बिट्टूचे कपडे, रक्ताचे डाग आणि धारदार शस्त्र मिळालं. आतापर्यंतच्या तपासात सुमितनेच जवळच्या मित्राची बिट्टूची हत्या केल्याच स्पष्ट झालं आहे. बेगूसरायची ही घटना आहे. बिट्टूच्या मृतदेहावर सिमरिया गंगा घाटावर 23 ऑक्टोंबरला अंत्यसंस्कार करण्यात आल्याच पोलिसांनी सांगितलं. बिट्टूला त्याच्या छोट्या भावाने मुखाग्नी दिला. बिट्टूच्या मृतदेहाची ओळख पटवता येऊ नये, यासाठी सुमितने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने बिट्टूच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करुन इथे-तिथे फेकले होते.
पोलिसांनुसार, सुमित आणि बिट्टूमध्ये समलैंगिक संबंध होते असा आरोप गावकऱ्यांनी केला. बिट्टूच्या कुटुंबियांकडून त्याच्या लग्नासाठी हालचाली सुरु होत्या. सुमितचा बिट्टूच्या लग्न करण्याला विरोध होता. बिट्टूने सुमितचा विरोध जुमानला नाही. त्याचा हट्ट ऐकला नाही, म्हणून बिट्टूची हत्या करण्यात आली. बिट्टूच्या कुटुंबियांनी त्याच्या लग्नाची बोलणी सुरु असल्याच इन्कार केला आहे.
खड्डयात बिट्टूच धड मिळालं
बिट्टू कुमार शनिवार 19 ऑक्टोंबरला आपल्या घरातून कोचिंग क्लासला निघाला होता. तो शिक्षक होता. संध्याकाळ होऊनही बिट्टू घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबियांना चिंता सतावू लागली. त्याला फोन केला, तेव्हा फोन बंद होता. त्यानंतर कुटुंबियांनी बिट्टू बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांना सोमवारी 21 ऑक्टोंबरला चकीया थर्मल हॉल्टजवळ पाण्याने भरलेल्या खड्डयात बिट्टूच धड मिळालं. मंगळवारी 22 ऑक्टोंबरला मृतदेहाच तुकडे मिळाले. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनसाठी पाठवले होते.