बायको म्हणाली नामर्द, पंचायत बोलवून सुनावणी, मग नवऱ्याने दिला पुरावा, पण…

| Updated on: Aug 03, 2024 | 3:09 PM

"माझ्या भावासोबत पंचायतीत मोठा खेळ झाला. त्यामुळे त्याने टोकाच पाऊल उचललं. त्याला गावात नपुंसक ठरवण्यात आलं. त्यामुळे लाजेपोटी तो कुठेच येत-जात नव्हता. पंचायतीच म्हणणं होतं की, जमीन विकं, काहीही करं, तुला पैसे आणि दागिने परत करावे लागतील"

बायको म्हणाली नामर्द, पंचायत बोलवून सुनावणी, मग नवऱ्याने दिला पुरावा, पण...
Marriage
Follow us on

बायको नामर्द म्हणायची म्हणून एका युवकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पत्नी नामर्द बोलत असल्याने पती डिप्रेशनमध्ये आला होता. पत्नीच्या आरोपावरुन पंचायत बोलवण्यात आली, त्यावेळी युवकाला नामर्द मानून 80 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. युवकाच तीन महिन्यापूर्वी 5 मे रोजी एका युवतीसोबत लग्न झालं. लग्नाच्या एक आठवड्यानंतर पत्नीने तिच्या आईला कॉल केला व पती नपुंसक असल्याच सांगितलं. सासर सोडून ती माहेरी निघून गेली. बिहारच्या भागलपुरमधील नाथनगर प्रखंड गावातील ही घटना आहे.

पत्नीकडच्या लोकांनी नवऱ्यासोबत चर्चा केली व रुग्णालयात त्याला उपचार घ्यायला सांगितलं. त्यानंतर मुलीची समजूत काढून तिला पतीच्या घरी पाठवलं. यानंतर गोष्टी सुरळीत होणं अपेक्षित होतं, पण प्रकरण अजून बिघडलं. युवतीने पुन्हा पंचायत बोलवली. 7 व 22 जूनला झालेल्या पंचायत बैठकीत वैद्यकीय तपासणीशिवाय युवकाला नामर्द ठरवलं. पत्नीला सोडावं लागेल व 80 हजार रुपये द्यावे लागतील. लग्नात मिळालेले दागिने परत करावे लागतील असे आदेश पंचायतीने दिले.

डॉक्टरांनी काय सांगितलं?

पंचायतीच्या या निर्णयाने युवकाला मोठा धक्का बसला. त्याने शहरातील डॉक्टरकडून आपली तपासणी करुन घेतली. डॉक्टरच्या विश्लेषणानुसार तो युवक नामर्द नव्हता, तर त्याच्यामध्ये कमजोरीची समस्या होती. औषधाने त्याला यावर मात करणं शक्य होतं. त्यानंतर रिपोर्ट घेऊन त्याने समाजातील लोकांना दाखवला. पण कोणी त्याचं म्हणण ऐकण्यास तयार नव्हतं. तू खोटा रिपोर्ट दाखवतोयस असं लोकांच म्हणणं होतं.

लोकांचे टोमणे ऐकून उचललं टोकाच पाऊल

शुक्रवारी पुन्हा एकदा पंचायत बोलवण्यात आलेली. पण लोकांचे टोमणे ऐकून गुरुवारीच युवकाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग पाऊडरमध्ये केमिकल मिसळून तो प्यायला. त्याची तब्येत बिघडली. उलट्यांचा त्रास सुरु झाला. बहिणीने आरडोओरडा सुरु केल्यानंतर आसपासचे लोक तिथे पोहोचले. त्यांनी युवकाला लगेच मायागंज रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

‘आम्हाला न्याय हवा आहे’

“माझ्या भावासोबत पंचायतीत मोठा खेळ झाला. त्यामुळे त्याने टोकाच पाऊल उचललं. त्याला गावात नपुंसक ठरवण्यात आलं. त्यामुळे लाजेपोटी तो कुठेच येत-जात नव्हता. पंचायतीच म्हणणं होतं की, जमीन विकं, काहीही करं, तुला पैसे आणि दागिने परत करावे लागतील. मेडिकल रिपोर्टमधून माझा भाऊ नपुंसक नसल्याच सिद्ध झालं होतं. आता आम्हाला न्याय हवा आहे” असं युवकाच्या बहिणीने म्हटलं आहे.