‘नोकरी वाचवायची असेल, तर मला खुश करत राहा…’ कुठल्या ऑफिसमध्ये महिलेसोबत हे घडलं?

| Updated on: Dec 20, 2024 | 2:00 PM

एका महिला कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. नोकरी टिकवण्यासाठी एक वरिष्ठाने या महिलेवर दबाव आणला. किती वर्ष महिलेने हा त्रास सहन केला? त्यानंतर कधी प्रकरण समोर आलं? त्या बद्दल जाणून घ्या.

नोकरी वाचवायची असेल, तर मला खुश करत राहा... कुठल्या ऑफिसमध्ये महिलेसोबत हे घडलं?
office boss physically exploit female employee
Follow us on

आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा नोकरी करतात. घरदार संभाळून त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. अशावेळी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. पण काहीवेळी समाजातील विकृत मानसिकतेमुळे स्त्रिया शोषणाच्या बळी ठरतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “मॅडम माझ्यासोबत काम करणारा युवक माझं लैंगिक शोषण करतो. मी त्याला विरोध करते, तेव्हा तो कामामध्ये चुका शोधतो. त्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देतो” पोलिसांनी युवतीची तक्रार नोंदवून घेत तपास सुरु केला आहे.

प्राथमिक तक्रारीनुसार पीडित युवती जीविका संस्थेत नोकरी करते. तिची ढेकसारा येथे राहणाऱ्या समीर कुमार बैठासोबत ओळख झाली. समीर कुमार जीविका संस्थेत बुक-कीपरच्या पदावर कार्यरत आहे. तो छोट्या-छोट्या चूका काढायचा. नोकरी टिकवायची असल्याने मी त्याचं ऐकायची. त्याची युवतीवर वाईट नजर असल्याचा आरोप आहे. बिहारच्या किशनगंजच हे प्रकरण आहे.

फसवून मला त्याच्या भाड्याच्या घरात नेलं

“मी त्याचं ऐकत नाही, तेव्हा तो बोलतो की तुला ऐकावच लागेल, नाहीतरी नोकरी गमवावी लागेल. नोकरी टिकवायची असेल, तर मला खुश करत राहा” युवतीने सांगितलं की, “चार-साडेचार वर्षांपूर्वी 2020 साली तो फसवून मला त्याच्या भाड्याच्या घरात घेऊन गेला, तिथे त्याने दुष्कर्म केलं” “विरोध केल्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने अनेकदा माझं शारीरिक शोषण केलं” असा आरोप युवतीने केला आहे.

गर्भ पाडण्याच औषध दिलं

तक्रारीनुसार, पीडित युवती काही दिवसांनी गर्भवती राहिली. त्यावेळी त्याने गर्भ पाडण्याच औषध दिलं. लोकलाजेस्तव मी माझ्या कुटुंबीयांनाही याबद्दल काही बोलली नाही. अखेर एक दिवस या त्रासाल कंटाळून ती महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.