चांगल्या पदावर काम करणारी एक महिला अधिकारी विवाहित असूनही एका शिपायाच्या प्रेमात पडली. तिचा चांगला घर-संसार होता. पदरात दोन मुलं होती. पण प्रियकरासाठी तिने नवऱ्याला सोडलं. मुलांची सुद्धा तिला दया आली नाही. इतकी ती शिपायाच्या प्रेमात आंधळी झालेली. भरलेला संसार सोडून ती प्रियकरासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागली. प्रियकर कॉन्स्टेबल तर ही महिला, अधिकारी हुद्दयावर कार्यरत होती. डोळ्यावर प्रेमाची इतकी भूल चढलेली की, पुढे काय होणार? हे तिला माहित नव्हतं. नवऱ्याला धोका देणाऱ्या या महिलेची सुद्धा फसवणूक झाली. प्रियकर शिपायाने तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. त्याने दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न केलं.
आता ही महिला अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मदत मागत आहे. हे प्रकरण बिहारच आहे. पाटण्याच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार नोंदवली आहे. लग्नाच आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा तिने आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. महिला अधिकारी कोर्टात नोकरीला आहे. आरोपी शिपाई पोलीस कंट्रोल रुममध्ये तैनात असतो. महिला आधीपासूनच विवाहित आहे. तिला दोन मुलं आहेत. बऱ्याच काळापासून ती नवऱ्यापासून वेगळी राहतेय. आरोपी शिपाई मूळचा जुमई जिल्ह्याचा आहे. पाटण्यामध्ये त्याची महिला अधिकाऱ्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. प्रेमसंबंध निर्माण झाले.
किती वर्ष एकत्र ?
महिला अधिकारी आणि प्रियकर शिपाई 6 वर्ष एकत्र राहिले. लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर त्याने धोका दिला असा आरोप आहे. त्याने फतुहा कोर्टात दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं. महिलेच्या तक्रारीवरुन FIR नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.