राजकीय षडयंत्रातूनच खंडणीचा गुन्हा दाखल; गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले

| Updated on: Jan 05, 2021 | 11:54 AM

माझ्याविरोधातील खंडणी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. (Bjp Leader Girish Mahajan clarification on crime against him)

राजकीय षडयंत्रातूनच खंडणीचा गुन्हा दाखल; गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले
गिरीश महाजन, भाजप नेते.
Follow us on

जळगाव: माझ्याविरोधात पुण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग असून त्याचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. (Bjp Leader Girish Mahajan clarification on crime against him)

गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाजन यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असं महाजन म्हणाले.

या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत: उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेल, असं ते म्हणाले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ ही मराठा समाजाची संस्था आहे. ती केवळ मराठा समाजापूरतीच मर्यादित आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीवर इतर समाजाचे लोक येऊ शकत नाहीत, असं त्यांच्या बायलॉजमध्येच नमूद करण्यात आलेलं आहे. मी ओबीसी असून माझे इतर सहकारी वेगवेगळ्या समाजातील आहेत. मग ते या संस्थेचे सदस्य कसे होतील? आम्ही ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न केला असं कसं म्हणता येईल? असे सवाल करतानाच या मागे बोलवता धनी कोण आहे, हे सर्वांनाच माहीत असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Bjp Leader Girish Mahajan clarification on crime against him)

 

संबंधित बातम्या:

भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत; पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

किरीट सोमय्यांचा मोठा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

दुचाकी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर यांना अटक

मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब

(Bjp Leader Girish Mahajan clarification on crime against him)